यंदाच्या वर्षी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्यावरच चाहत्यांच्या नजरा खिळलेल्या असतील. रणवीर आणि दीपिकाच्या नात्याला यंदाच्या वर्षी एक अत्यंत महत्त्वाचं वळण मिळणार असून, ते दोघंही विवाहबंधनात अडकणार असल्याची चिन्हं आहेत. सध्या तर या दोघांच्याही घरी लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली असल्याचं कळत आहे. रणवीर आणि दीपिका या दोघांचीही कुटुंब या संपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असून, आता त्याविषयीची काही माहितीसुद्धा माध्यामांकडून चाहत्यांपर्यंत पोहोचत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्याच्या घडीला दीपिका आणि रणवीर त्यांच्या करिअरला प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळत आहे. बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर त्या दोघांच्या प्रेमाच्या चर्चांनी जोर धरला. अखेर मैत्रीत प्रेम बहरल्यानंतर अखेर त्या दोघांनीही आपल्या नात्याचा गांभीर्याने विचार करत लग्नाचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. मुख्य म्हणजे दोघांकडून अद्यापही याविषयीची कोणतीत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण, दीपिका येत्या काळात लग्न झाल्यानंतर तिच्या करिअरला रामराम करणार असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे.

‘त्या’ तिघांमुळे माझ्या आयुष्याची कहाणीच बदलली- सनी लिओनी

‘डीएनए’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दीपिकाने एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला होता. लग्नानंतर आपण चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेण्याचा निर्णय घेऊ, असं तिने सांगितलं होतं. कुटुंबासोबतच जास्त वेळ व्यतीत करण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचंही तिने सांगितलं. कुटुंबाशिवाय माझ्या आयुष्यात इतर कोणतीही महत्तवाची गोष्ट नाही, असंही ती म्हणाली होती. त्यामुळे आता लग्नानंतर खरंच दीपिका आपल्या या वक्तव्यावर ठाम राहते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress deepika padukone ranveer singh wedding career decision