बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता अक्षय कुमारने आतापर्यंत इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण हे यश त्याला सहज मिळालं नव्हतं. त्याला सिनेसृष्टीत काम मिळविण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला होता. अक्षयने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याचे कुटुंब जेव्हा दिल्लीतून मुंबईत राहायला आले, तेव्हाची आठवण सांगितली आहे. तसेच मुंबईत तेव्हा घराचं भाडं किती होतं, याबाबतही अक्षयने खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी आतापर्यंत १५० चित्रपट केले आहेत आणि…”, ‘मिशन रानीगंज’ फ्लॉप झाल्यावर अक्षय कुमारचे विधान; म्हणाला, “हा चित्रपट…”

‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला, “नवी दिल्लीतील चांदणी चौकातील एकाच घरात आम्ही २४ जण राहत होतो. आम्ही सगळे एकाच खोलीत झोपायचो. सकाळी व्यायामासाठी उठलो की बाहेर पडण्यासाठी सगळे एकमेकांवर उड्या मारायचे.” दरम्यान, अक्षयने दिल्लीतून मुंबईत आल्यानंतरची परिस्थिती सांगितली.

सायन कोळीवाडा भागात १०० रुपये भाड्याने आपलं कुटुंब राहत होतं, अशी आठवण अक्षयने सांगितली. “मी देवाची शपथ घेऊन सांगतो, असा एकही दिवस नव्हता जेव्हा आम्ही हसायचो नाही. आता आमच्याकडे पैसा आहे तरीही कधी कधी कोणत्या तरी कारणाने थोडं वाईट वाटतं पण त्यावेळेस दु:खी राहण्यासारखं काही नव्हतं. आमच्याकडे दाळभात, जिरा आलू, आलू गोभी, भिंडी, हे सर्व खायचो आणि आम्ही खूप आनंदी होतो,” असं अक्षयने सांगितलं.

अक्षय व त्याच्या कुटुंबाला सिनेमाची खूप आवड होती. सिनेमा बघण्यासाठी ते शनिवारी जेवायचे नाहीत. “सिनेमाच्या तिकिटासाठी पैसे वाचवण्यासाठी आम्ही जेवण करायचो नाही. त्या पैशातून तिकीट घ्यायचो आणि चित्रपट बघायला जायचो,” अशी आठवण अक्षय कुमारने सांगितली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar lived with 100 rupees rent in small house mumbai hrc