मार्च २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काश्मिरी पंडितांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले. प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दाखवली. बॉक्स ऑफिसवर ‘द काश्मीर फाईल्स’ने जुने विक्रम मोडत नवा इतिहास रचला. याआधी विवेक यांचा ‘ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘ताश्कंद फाईल्स’, ‘काश्मीर फाईल्स’ यांच्यानंतर लगेच त्यांचा ‘दिल्ली फाईल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी चर्चा सुरु असतानाच विवेक यांनी नव्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विवेक अग्निहोत्री ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फार सक्रिय आहेत. या माध्यमाद्वारे ते वेगवेगळ्या मुद्द्यांवर व्यक्त होत असतात. त्यांनी त्यांनी ट्विटरवर नव्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्या फोटोवर ‘द __ वॉर’ असे लिहिले आहे. त्याखाली ‘रिकामी जागा भरा’ हे वाक्य लिहिलेले आहे. विवेक यांनी या फोटोला ‘चित्रपटाचे नाव ओळखा’ असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा – ‘हॅरी पॉटर’मधील ‘सॉर्टिंग हॅट’ला आवाज देणाऱ्या अभिनेत्याचे निधन

या फोटोच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच जणांनी चित्रपटाचे नाव ओळखण्याचा प्रयत्न केला आहे. तेथे एका यूजरने ‘इन्फॉरमेशन वॉर’ (Information war) अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या यूजरने ‘सोशल वॉर’ (Social war) असे लिहिले आहे. तेथे काही गमतीदार कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. अपूर्व गुप्ता या कॉमेडियनने या पोस्टखाली ‘द सल वार’ असे लिहिले आहे. या कमेंटला विवेक यांनी हसतानाचे इमोजो वापरुन रिप्लाय दिला आहे. तेथे एकाने सोमवार, मंगळवार, बुधवार अशी वारांची नावं लिहिल्याचेही दिसते. तेथे काहीजणांनी द ‘शरद प’-वार अशा कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा – “हर हर महादेव बघायला जाताना भीती…” आस्ताद काळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

१० डिसेंबरपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. नाना पाटेकर, पल्लवी जोशी, निवेदिता भट्टचार्य असे कलाकार यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. करोना काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये covaxin लस कशा प्रकारे तयार करण्यात आली ही गोष्ट दाखवण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comedian has commented on the poster of vivek agnihotris upcoming film yps