१९९५ मध्ये शाहरुख खान आणि काजोल यांचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. गेल्या अनेक वर्षांपासून हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आजही मराठा मंदिरमध्ये या चित्रपटाचे शो लागतात. नव्वदच्या दशकामध्ये या चित्रपटाची मोठी क्रेझ होती. याआधीही शाहरुख-काजोलच्या जोडीने एकत्र चित्रपट केले होते. पण या चित्रपटासारखी किमया त्याच्या कोणत्याही चित्रपटाला करता आली नाही. आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाला २७ वर्ष पूर्ण झाली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परदेशात राहणाऱ्या बलदेव सिंह यांची लाडकी लेक सिमरन आणि धर्मवीर मल्होत्रा या श्रीमंत उद्योगपतीचा मुलगा राज यांची ही प्रेमकथा आहे. यशराज प्रोडक्शनच्या आदित्य चोप्रा यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’चे लेखन-दिग्दर्शन केले होते. शाहरुख, काजोल यांच्या व्यतिरिक्त अमरीश पुरी, फरीदा जलाल, सतीश शहा, अनुपम खेर, मंदिरा बेदी, परमीत सेठी अशी तगडी स्टार कास्ट या चित्रपटाला लाभली होती. या चित्रपटाने त्या वर्षातले बॉक्स ऑफिसवरचे सर्व विक्रम मोडले होते. हा चित्रपट इतका लोकप्रिय होईल असे कोणालाही वाटले नव्हते.

आणखी वाचा – Bigg Boss 16 : अब्दू रोजिक वयाने स्वतःपेक्षा मोठ्या असलेल्या ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात, शिव ठाकरे म्हणाला…

एका मुलाखतीमध्ये शाहरुखने चित्रपटाच्या यशाचे रहस्य उलगडले होते. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तो म्हणाला होता, “त्यावेळी प्रदर्शित होणारे बरेचसे चित्रपट हे अ‍ॅक्शनपट या शैलीतले होते. तेव्हा अश्या पद्धतीच्या रोमँटिक चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हाच्या चित्रपटांमध्ये जेव्हा नायक-नायिका एकमेकांच्या प्रेमामध्ये पडायचे आणि त्यांच्या नात्याला घरातल्या मोठ्यांकडून विरोध व्हायचा तेव्हा ते पळून जाऊन लग्न करायचे. त्यावेळी तसा ट्रेड होता.”

आणखी वाचा – “आम्हाला शाहरुखचा…”; दिग्दर्शक फरहान अख्तरच्या ‘त्या’ पोस्टवर नेटकऱ्यांनी केली मागणी!

तो पुढे म्हणाला, “आमच्या चित्रपटाने हा पायंडा मोडला. राज मल्होत्राकडे सिमरनला घेऊन पळून जाण्याची संधी होती. एकदा तर तिची आईच त्यांना पळून लग्न करायला सांगत होती. पण त्याने परिस्थितीला तोंड देण्याची हिंमत दाखवली. राजने दोघांच्या आईवडिलांच्या परवानगीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने मार देखील खाल्ला. माझ्या मते, त्या दोघांसाठी पळून जाणं पसंत नव्हतं आणि हिच बाब प्रेक्षकांना भावली.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ddljs 27 years shah rukh khan explained dilwale dulhania le jayenges success yps