अभिनेत्री मलायका अरोरा अरबाज खानपासून विभक्त झाल्यावर खान कुटुंबाबरोबर दिसत नाही. पण आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाजचे वडील सलीम खान यांच्याबरोबर दिसत आहे. यावेळी मलायकाबरोबर तिची आई जॉयसी अरोरादेखील होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलीम खान, मलायका अरोरा व जॉयसी अरोरा हे तिघेही एका हॉटेलमधून बाहेर पडताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले. या हॉटेमध्ये पार्टी होती आणि अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी याठिकाणी आले होते. या हॉटेलमधून आधी सलीम खान बाहेर पडले, त्यापाठोपाठ मलायका व तिची आई बाहेर पडले. नंतर सलीम खान व जॉयसी एकाच कारने एकत्र गेले. विरल भयानी व इन्स्टंट बॉलीवूडने शेअर केलेले हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Video: गर्दीतून ‘नमस्कार वहिनी’ अशी हाक येताच आलिया भट्टने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, पाहा व्हिडीओ

अरबाज व मलायका मुलगा अरहानबरोबर आधी एकत्र दिसायचे. पण अरबाजने शुरा खानशी दुसरं लग्न केलं, तेव्हापासून हे दोघेही पूर्वाश्रमीचे जोडीदार एकत्र दिसत नाही. अरहान बऱ्याचदा त्याच्या आईबरोबर दिसतो. तसेच खान कुटुंबाचा कार्यक्रम असेल तर तेव्हा तो त्याचे वडील व सावत्र आई शुरा यांच्याबरोबर कार्यक्रमाला हजेरी लावतो.

घटस्फोटानंतर २४ वर्षांनी शेफाली शाहचा पहिला पती म्हणाला, “आम्ही कधी एकमेकांसमोर आलो तर…”

अरबाज खान व मलायका यांनी १९९८ मध्ये प्रेम विवाह केला होता. १९ वर्षे संसार केल्यानंतर २०१७ मध्ये या जोडप्याने घटस्फोट घेतला. तेव्हापासून मलायका अभिनेता अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. तर, अरबाज आधी जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत होता, पण त्यांचं ब्रेकअप झालं आणि काही काळाने त्याने रवीना टंडनची मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी डिसेंबर २०२३ मध्ये लग्न केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaika arora with salim khan and mom joyce arora video viral hrc