दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि योगिता बाली यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याने सध्या एका मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींबद्दल खुलासे केले आहेत. मिथून चक्रवर्ती यांनी २००० साली बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम का केले? याबाबतचा खुलासा केला आहे. मिमोहचे उत्तर ऐकून अनेक जणांनी आश्चर्यचकित झाली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “बायको तुझ्याकडून सगळं काम करून घेते का?” चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख खानने दिलं मजेशीर उत्तर, म्हणाला, “बेटा…”

मिमोह म्हणाला, “बी ग्रेड चित्रपटांमध्ये त्यांनी आमच्यासाठी काम केले. आमच्या हॉटेलसाठी केले. बॉलीवूडच्या चित्रपटांचे प्रत्येक युनिट आणि साऊथचे प्रत्येक युनिट आमच्या हॉटेलमध्ये उतरायचे. ते पैशासाठी हे करत होते, पण असे नाही की त्यांचे निर्माते तोट्यात जात होते . ते एका चित्रपटावर ७० लाख रुपये खर्च करत असेल तर त्याच्या बदल्यात त्यांना १ कोटी रुपये मिळत होते. मला हे सांगताना खूप अभिमान वाटतो, पण त्यांचा पहिला आणि शेवटचा विचार नेहमीच त्यांच्या कुटुंबाबाबतच असतो.” असेही मिमोह म्हणाला.

हेही वाचा- “तो मला खूप…”; नवाजुद्दिनच्या पत्नीने केला ‘मिस्ट्री मॅन’बरोबरच्या नात्याचा खुलासा, म्हणाली…

मिमोह पुढे म्हणाला, संर्घषाच्या काळात मिथून यांच्याकडे झोपायलाही जागा नव्हती. त्यांच्या रूममेटने त्यामला हाकलून दिले होते. त्यांच्या जेवणाची भ्रांत होती. जिममध्ये जाण्यासाठी ते बाथरूम साफ करत असल्याचेही मिमोह म्हणाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mithun chakraborty son mahaakshay chakraborty speaks about his fathers b grade films dpj