दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला सुपरहिट ठरला. ‘पुष्पा’मधील अल्लू अर्जुनच्या स्टाइलची व डायलॉगच्या चाहत्यांनाही भूरळ पडली होती. त्यानंतर आता या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच ‘पुष्पा २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता अल्लू अर्जुन याने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने बहुप्रतिक्षित ‘पुष्पा २’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनचा खास लूक पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “लक्ष्या काकांचा तो वारसा मी चालवला”, आदिनाथ कोठारेने सांगितली खास आठवण, म्हणाला “ते सेटवर आले की…”

या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनचा अर्धा चेहराही दिसत आहे. त्याच्या हातात सोन्याचे ब्रेसलेट आणि अंगठ्या पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच त्याच्या एका नखावर लाल रंगाची नेलपेंटही पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी त्याच्या बोटांवर रक्ताचे शिंतोडेही उडाल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा : “खरी शिवसेना कोणाची? शिंदेंची की ठाकरेंची?”; अभिजीत बिचुकले म्हणाला “शिवरायांचं नाव असेल तर…”

या नव्या पोस्टरबरोबरच ‘पुष्पा २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. येत्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी ‘पुष्पा २’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहता येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushpa 2 the rule release date announced allu arjun instagram post nrp