‘किंग खान’, ‘बाजीगर’, ‘किंग ऑफ रोमॅन्स’ अशा विविध नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणून शाहरुख खानला ओळखले जाते. शाहरुख हा कायमच त्याच्या कामामुळे चर्चेत असतो. शाहरुख हा त्याच्या कामाबरोबरच लाइफस्टाइलमुळेही कायमच चर्चेत राहतो. शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्याविषयी अनेकांना कुतूहल आहे. त्याच्या बंगल्याबाहेर चाहत्यांची कायमच गर्दी पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून शाहरुखचा ‘मन्नत’ बंगला हा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. शाहरुखच्या‘मन्नत’ बंगल्याबाहेर नवीन पाटी लावण्यात आली आहे. याचे अनेक फोटोही व्हायरल होत होते. आता त्यावर शाहरुखची पत्नी अभिनेत्री गौरी खानने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील वांद्रे परिसरातील शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला आहे. या बंगल्याबाहेर ‘मन्नत’ नावाची नवीन पाटी लावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या बंगल्याच्या नावाची पाटी डागडुजीच्या कारणाने काढण्यात आली होती. पण आता त्या जागी एक नवीन पाटी लावण्यात आली होती. या नवीन पाटीमध्ये डायमंड पाहायला मिळत आहे. त्यावर मोठ्या अक्षरात ‘मन्नत’ असे लिहिण्यात आले होते. त्यात छोटेछोटे एलईडी लाइट्स लावण्यात आले होते. शाहरुखच्या बंगल्याच्या या नव्या पाटीचे अनेक फोटोही समोर आले होते.
आणखी वाचा : “पण माझ्या डोक्यात हवा…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंत स्पष्टच बोलला

शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर नावाची नवीन पाटी पाहताच त्याचे चाहते थक्क झाले होते. त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या बंगल्याबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. त्याच्या बंगल्याबरोबरच त्याच्या बंगल्याच्या नव्या पाटीबद्दलही लोकांना प्रचंड आकर्षण वाटतं होते. त्यावेळी ‘मन्नत’च्या बाहेर आणखी गर्दी जमू लागली. यानंतर आता गौरी खानने याबद्दलचा खुलासा केला आहे.

गौरी खानने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतंच एक फोटो शेअर केला आहे. यात ती ‘मन्नत’ बंगल्याच्या बाहेर गेटजवळ उभी असल्याचे दिसत आहे. यावेळी तिच्या बाजूला ‘मन्नत’ नावाची नवीन पाटीही पाहायला मिळत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने या नव्या पाटीबद्दल सांगितले आहे.

आणखी वाचा : ‘मन्नत’ ते अलिबागमधील फार्महाऊस, बॉलिवूडच्या ‘किंग खान’ची एकूण संपत्ती किती?

“तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांचा एंट्री पॉईंट असतो. त्यामुळे बंगल्याच्या नावाची पाटी ही सकारात्मक उर्जा आकर्षित करते. याच कारणामुळे आम्ही एका ट्रान्सपरंट प्लेटच्या आत काचेचे क्रिस्टल लावले आहेत. यामुळे सकारात्मक उर्जा, आनंद आणि शांत वातावरण राहते”, असे कॅप्शन गौरी खानने दिले आहे. विशेष म्हणजे या नव्या नावाच्या पाटीचे डिझाईन गौरी खाननेचे बनवलं आहे. त्यामुळे सध्या शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर नावाची नवीन पाटी चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan mannat diamond nameplate know the truth behind wife gauri khan share photo and talk about nrp