बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’ व ‘जवान’सारख्या सुपरहीट चित्रपटानंतर प्रेक्षक व शाहरुखचे चाहते त्याच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाची वाट बघत आहेत. शाहरुखच्या यशात खारीचा वाटा आहे तो म्हणजे त्याच्या चित्रपटातील गाण्यांचा आणि हे खुद्द शाहरुखही मान्य करेलच. शाहरुखच्या सगळ्याच चित्रपटातील गाणी सुपरहीट ठरली, खासकरून ९० च्या दशकातील त्याच्या चित्रपटातील गाण्याचा एक स्वतंत्र चाहतावर्ग आहे. याच शाहरुखचा आवाज म्हणून एकेकाळी प्रसिद्ध असणारा गायक अभिजीत भट्टाचार्य हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अंजाम’, ‘डीडीएलजे’, ‘यस बॉस’, ‘बादशाह’, ‘मै हूं ना’, ‘बिल्लू’सारख्या शाहरुखच्या कित्येक चित्रपटांमध्ये अभिजीतने शाहरुखसाठी आवाज दिला व ती गाणी चांगलीच गाजलीदेखील. मध्यंतरी त्याने एकदा शाहरुखविषयी एक वादग्रस्त विधान केलं होतं, त्यानंतर २००९ साली आलेल्या ‘बिल्लू’ या चित्रपटात अभिजीतने शाहरुखसाठी शेवटचं गाणं म्हंटलं. आता पुन्हा एकदा अभिजीत शाहरुखविषयी भाष्य केल्याने चर्चेत आला आहे.

आणखी वाचा : Kantara 2 first look: गळ्यात रुद्राक्ष, हातामध्ये भाला अन् रिषभ शेट्टीचा रुद्रावतार; बहुचर्चित ‘कांतारा २’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

नुकत्याच ‘लेहरन रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिजीतने शाहरुखबद्दल भाष्य केलं आहे. शाहरुखच्या कलागुणांचं, स्वतःच्या हिंमतीवर एवढं मोठं साम्राज्य उभं करण्याचं कौतुक अभिजीतने कौतुक केलं आहे, परंतु अभिजीत म्हणाला, “आम्हाला अहंकार नाही, पण आम्ही दोघेही स्वाभिमानी आहोत.” शाहरुखबरोबरचे गैरसमज दूर करायचा प्रयत्नदेखील अभिजीतने केल्याचं स्पष्ट केलं, परंतु त्याचा काही फारसा फायदा झाला नाही. शिवाय शाहरुख फार व्यवहारी माणूस आहे जो तुमचा वापर करून घेतो अन् त्याच्या मार्गात अडथळा बनणाऱ्याला तो बाजूला करतो असंही अभिजीतने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.

या मुलाखतीमध्ये शाहरुखला राष्ट्रविरोधी म्हणणाऱ्या लोकांचा मात्र अभिजीतने चांगलाच समाचार घेतला. तो म्हणाला, “त्याला आजही बरेच लोक राष्ट्रविरोधी म्हणतात जे चुकीचं आहे. पण मला वाटतं की शाहरुखसारखा देशभक्त शोधून सापडणार नाही. सगळ्या खानांमध्ये शाहरुखच सर्वात मोठा राष्ट्रभक्त आहे. बाकीच्या लोकांचा देश किंवा राष्ट्र या संकल्पनेशी दूरदूरपर्यंत काहीच संबंध नाही.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer abhijeet bhattacharya says shahrukh khan is a commercial person avn