बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनीने मार्ग बदलत बॉलिवूडकडे वाटचाल केली. ती नेहमी तिच्या सिनेसृष्टीसह वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. नेहमी हसतमुख आणि आनंदी राहणारी अभिनेत्री म्हणून सनीला ओळखले जाते. नुकतंच सनीने एका चाहत्याने केलेल्या अजब मागणीवर कमेंट केली आहे. त्यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सनी लिओनी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती कायमच चाहत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना दिसते. सनी लिओनीचे जगभरात चाहते आहेत. नुकतंच पाकिस्तानचा रहिवासी असलेल्या ए. एम. खाननं त्याच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट केली होती. जर सनी लिओनीनं मला रिप्लाय केला तर मी सिगारेट सोडेन, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले होते. यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या होत्या.
आणखी वाचा : दत्तक घेतलेली मुलगी निशाचा हात न धरल्याने सनी लिओनी ट्रोल, स्पष्टीकरण देताना डॅनिअल म्हणाला…

सनी लिओनीच्या चाहत्याची कमेंट

त्यावर आता चक्क सनी लिओनीने उत्तर दिले आहे. स्वत:ला सनीचा चाहता सांगणाऱ्या ए. एम. खान नावाच्या तरुणाच्या त्या पोस्टवर सनीने कमेंट केली. “…मग तू सिगारेट केव्हा सोडतो आहेस?” असा प्रश्न सनीनं त्याला विचारला. तिच्या या उत्तरानंतर त्या चाहत्याने प्रतिक्रिया दिली आहे. “आश्चर्यकारक…! धन्यवाद तू प्रतिक्रिया दिल्याबद्दल.!!”, असे तिने म्हटले आहे. याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

सनी लिओनीची प्रतिक्रिया

आणखी वाचा : “१४ वर्षांपूर्वी या दिवशी…”, सनी लिओनीने आईच्या आठवणीत शेअर केली भावूक पोस्ट

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. अनेक नेटकरी तसेच चाहते आपापल्या आवडत्या कलाकाराला टॅग करत विविध मागण्या करत आहेत. यावरुन ते ट्रोलही होत असले तरी हा ट्रेंड चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.  

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone replied to a fan comment who want to quit smoking actress said nrp