Animal हा रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी यांचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप धुमाकूळ घालतो आहे. संदीप वंगा रेड्डी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तृप्ती डिमरीने चित्रपटात बोल्ड सीन दिले आहेत. अशात आता तिने विराट कोहलीविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. ग्लॅमरच्या दुनियेत तृप्ती डिमरी चर्चेत आली आहे. तिच्याबाबत सोशल मीडियावरही लोक सर्च करत आहेत. अशात तिने विराटबाबत एका मुलाखतीत स्पेशल वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाली तृप्ती डिमरी?
“विराट कोहली हा माझा आवडता क्रिकेट आहे. यात माझ्या मनात काहीही शंका नाही किंवा कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही.” तुझा आवडता क्रिकेटर कोण? असा प्रश्न तृप्तीला विचारण्यात आला होता. त्यावर तृप्तीने हे उत्तर दिलं आहे. जे वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे.
तृप्तीच्या झोया या भूमिकेचं होतंय कौतुक
Animal या सिनेमात तृप्ती डिमरीने झोया ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तृप्ती डिमरीच्या भूमिकेचं कौतुक होतं आहे. तसंच अॅनिमल सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून तिच्या चाहत्यांमध्येही वाढ झाली आहे. सोशल मीडियावर काही नेटकरी तिला बोल्ड सीनसाठी ट्रोलही करत आहेत. तर अनेकांना तो सीन आवडला आहे. तृप्ती डिमरीने २०१७ मध्ये आलेल्या श्रीदेवीच्या मॉम या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. आत्तापर्यंत तृप्ती डिमरीने सहा चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने नुकत्याच झालेल्या विश्वचषकात उत्तुंग कामगिरी केली आहे. याच विश्वचषकात त्याने सचिनचा विक्रम मोडला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातला पाच सामन्यांच्या टी २० मालिकेत विराट कोहली संघात नव्हता. कसोटी मालिकेत विराट कमबॅक करणार आहे.