‘राम लीला’, ‘पद्मावत’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी जोडी म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग. आता ही जोडी पुन्हा एकदा ’83’ चित्रपटात एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग कपील देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे तर दीपिका कपिल यांची पत्नी रोमी देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिका ही बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या चित्रपटासाठी दीपिकाने किती मानधन घेतले याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिका ‘८३’ चित्रपटातील छोट्या भूमिकेसाठी तयार नव्हती. कारण आता पर्यंत दीपिकाने सर्व चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकाच साकारल्या आहेत. तसेच दीपिकाने या चित्रपटात काम करण्यासाठी १४ कोटी रुपयांचे मानधन घेतले असल्याचे म्हटले जात आहे.

यापूर्वी रणवीरने दीपिका ’83’ चित्रपटात काम करणार असल्याचे एका अनोख्या पद्धतीने सांगितले होते. त्याने त्याच्या ट्विटर खात्यावर एक जिफ फाइल शेअर केली होती. या फाइलमध्ये दीपिका रणवीरला मजेशीर अंदाजात बॅटने मरताना दिसत होती. ‘माझी जीवन कथा! रिल आणि रिअल’ असे ट्विटमध्ये लिहिले आहे. रणवीर आणि दीपिकाचा लग्नानंतरचा हा पहिला एकत्र चित्रपट आहे.

लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘83 ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क,चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच हा चित्रपट १० एप्रिल २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone taking 14 crore for 83 movie avb