Nayanthara News : टॉलीवूड अभिनेत्री नयनतारा सध्या तिच्या ‘नयनतारा : बियॉण्ड द फेयरी टेल’ या डॉक्युमेंट्रीमुळे चर्चेत आहे. या डॉक्युमेंट्रीमुळे नयनताराच्या अडचणी काहीशा वाढल्या आहेत. कारण- अभिनेता धनुषने त्याच्या ‘नानुम राउडी धान’ चित्रपटातील तीन सेकंदांच्या क्लिपचा वापर डॉक्युमेंट्रीमध्ये केल्याचा दावा केला आहे. तसेच याबाबत ‘नयनतारा : बियॉण्ड द फेयरी टेल’च्या निर्मात्यांवर कॉपीराईट हक्काचे उल्लंघन केल्यावरून १० कोटी रुपयांच्या दावा दाखल केला आहे. नयनतारा आता चांगलीच भडकली असून, तिने याबाबत सोशल मीडियावर एक मोठे पत्र पोस्ट करीत धनुषला उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनुषने १० कोटींची कॉपीराईटबाबत दावा केल्याने नयनताराने आपल्या पत्रातून नाराजी व्यक्त केली आहे. तिने यात लिहिले आहे, “ही तुमची आतापर्यंतची सर्वांत वाईट वागणूक आहे. ऑडिओ लाँचवेळी तुम्ही साध्याभोळ्या चाहत्यांसमोर जसे वागता, त्यातील खरे आणि चांगले गुण तुमच्यात खरोखर असते, तर आज चित्र काही वेगळे दिसले असते. फक्त तीन सेकंदांच्या व्हिडीओसाठी १० कोटींचा कॉपीराईट दावा करणे यातून तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती आहात हे दिसून येते.”

हेही वाचा : Video : लाडकी लेक कडेवर अन् अंबानींच्या नातीला पाहताच रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

नयनताराने आपल्या पत्रात पुढे लिहिले आहे की, ‘नानुम राउडी धान’ चित्रपटातील काही भाग वापरता यावा यासाठी आम्ही तुम्हाला विनंती केली होती. आम्ही तुम्हाला वारंवार विचारले होते. तुमच्या उत्तराचीही आम्ही वाट पाहिली. मात्र, तुम्ही मुद्दाम आम्हाला एनओसी दिली नाही. या चित्रपटातील गाण्याचा काही भाग आम्हाला हवा होता; मात्र तुम्ही यातील गाणं आणि फोटो घेण्याचीही परवानगी दिली नाही.

नयनताराने पुढे लिहिलं आहे, “शेवटी आम्ही डॉक्युमेंट्रीमधील तो भाग कट करून, पुन्हा एडिट करण्याचा निर्णय घेतला. डॉक्युमेंट्रीमध्ये असलेला भाग ‘नानुम राउडी धान’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी काही व्यक्तींनी आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला होता. त्यावरदेखील तुम्ही आक्षेप घेतला आणि केवळ तीन सेकंदांसाठी कायदेशीर कारवाई केली.”

“तुम्ही पाठवलेली कायदेशीर नोटीस आम्हाला मिळाली आहे. आता आम्हीदेखील यावर कायदेशीर उत्तरे देऊ. नेटफ्लिक्स डॉक्युमेंट्रीसाठी ‘नानुम राउडी धान’ चित्रपटातील काही भाग वापरण्यावर तुम्ही आम्हाला नकार दिला होता. त्याने तुम्ही न्यायालयात निकाल तुमच्या बाजूने फिरवू शकाल. मात्र, मला तुम्हाला सांगायचे आहे की, या प्रकरणाची आणखी एक नैतिक बाजू आहे”, पत्रात असे सर्व नमूद करून, शेवटी अभिनेत्रीने ओम नमः शिवाय अशी कॅप्शन लिहिली आहे.

हेही वाचा : ‘या’ सिनेमाचा पहिलाच सीन शूट करताना नवख्या दिग्दर्शकावर चिडलेले अमिताभ बच्चन; सर्वांसमोर ओरडले अन् मग…

डॉक्युमेंट्री केव्हा रिलीज होणार?

‘नयनतारा : बियॉण्ड द फेयरी टेल’ डॉक्युमेंट्री १८ नोव्हेंबर २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. त्यामध्ये अभिनेत्री नयनताराचा सिनेविश्वातील आतापर्यंतचा प्रवास पाहायला मिळेल. त्यात अभिनेत्रीच्या आयुष्यात आलेल्या आव्हानांचीदेखील झलक पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhanush sent a legal notice nayanthara responded by writing a letter on social media documentary nayanthara beyond the fairy tale rsj