करण जोहरची निर्मिती असलेला कपूर अॅण्ड सन्स हा चित्रपट त्याच्या ट्रेलरनंतर बराच चर्चेत आला आहे. या चित्रपटात आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि फवाद खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुरुवातीला या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा हा समलैंगिंक व्यक्तीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. मात्र, सिद्धार्थऐवजी या चित्रपटात त्याच्या भावाची भूमिका साकारत असलेला फवाद हाच समलैंगिक भूमिका साकारत असल्याचे कळते.
याविषयी विचारले असता फवाद म्हणाला की, प्रत्येकजण समलैंगिक असतो, हो ना? हा चित्रपट लैंगिकता किंवा लव्ह ट्रँगलवर आधारित नाही. या चित्रपटाविषयी लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत. चित्रपटातील  माझ्या भूमिकेबाबत तर लोकांना जास्तच गैरसमज आहेत. पण, जरी मी चित्रपटात समलैंगिक व्यक्तीरेखा साकारली असेल तरी त्यात गैर काहीच नाही असे मला वाटते, असे फवाद म्हणाला.
शकुन बात्रा दिग्दर्शित ‘कपूर अॅण्ड सन्स’ हा चित्रपट १८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. यात आलिया भट, सिध्दार्थ मल्होत्रा, ऋषी कपूर, रत्ना पाठक शाह आणि रजत कपूर यांच्या भूमिका आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fawad khan responds to playing gay in kapoor sons