हिंदी मालिकांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे करणवीर बोहरा. करणवीरने उत्तम काम करत प्रेक्षकांना आपलंस केलं. सध्या तो मालिकांपासून दूर असला तरी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ‘तेरे जिस्म मे’ हा त्याचा म्युझिक व्हिडीओ लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये करण व पुनम पांडेची केमिस्ट्री पाहायला मिळेल. करण-पुनम सध्या या म्युझिक व्हिडीओच्याच प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. यादरम्यान व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे करण चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Photos : खऱ्या आयुष्यात प्रथमेश परबला मिळाली प्राजू? गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

प्रमोशनसाठी कायपण असंच सध्या या दोघांचं सुरु असल्याचं नेटकरी सातत्याने म्हणत आहेत. मध्यंतरी करणने तिला उचलून घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान झाला होता. यावेळीही करणला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा या दोघांचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

‘तेरे जिस्म मे’च्या पोस्टर लाँच कार्यक्रमामध्ये करणवीर-पुनम यांच्यामध्ये जवळीक पाहायला मिळाली. हा प्रमोशनचाच एक भाग असला तरी चाहत्यांना त्यांचं हे वागणं काही पटलेलं नाही. पुनमसह करणही विचित्र हावभाव करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा – “मला रात्री झोप येत नाही तेव्हा…” नवऱ्याविषयी बोलताना कतरिना कैफने उघड केलं बेडरुम सिक्रेट

पत्नीबरोबर घटस्फोट घेतला आहे हेच काही दिवसांनी तू सोशल मीडियावर पोस्ट करशील, प्रमोशनसाठी काहीही करतात, घटस्फोट होण्यापूर्वी हे थांबव असं अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून करणवीरला म्हटलं आहे. ‘लॉकअप’ या शोदरम्यान पुनम-करणवीरची मैत्री झाली होती. आता पुन्हा एकदा हे दोघं एकत्र आले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karanvir bohra poonam pandey gets romantic couple trolled video goes viral on social media kmd