कार्तिक आर्यन हा बॉलीवूड मधला चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. त्याने त्याच्या उत्तम अभिनय आणि मेहनतीमुळे लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कार्तिक आर्यन आपल्या आगामी चित्रपटांनासाठी बराच चर्चेत आहे. कार्तिकने काही दिवसांपूर्वी त्याच्या आगामी चित्रपट ‘सत्यनारायण की कथा’चा टीजर आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या चित्रपटात बॉलिवूडमधील लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक म्हणजे साजिद नाडियाडवाल यांच्यासोबत आता कार्तिक काम करणार आहे. साजिद यांच्या या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी दिग्दर्शक समीर विद्धवंस करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटासोबतच कार्तिक आर्यन लवकरच आणखी एक चित्रपटात काम करणार असल्याची बातमी समोर येत आहे. नुकतच कार्तिक आर्यनला एका प्रॉडक्शन हाऊसच्या बाहेर स्पॉट करण्यात आले होते. त्यानंतर अशी चर्चा रंगते आहे की तो लवकरच एक नवीन चित्रपटावर काम करणार आहे.

कार्तिकला निर्माता दिनेश विजानच्या ऑफीस बाहेर स्पॉट करण्यात आले होते. या आधी साउथ क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदानाला पण निर्माते दिनेश विजानच्या प्रॉडक्शन हाऊस (मैडॉक फिल्मस) बाहेर स्पॉट करण्यात आले होते. असे म्हंटले जात आहे की या दोघांना एकाच चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता या दोघांची जोडी एकत्र दिसणार का? अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगताना दिसत आहे. या दोघांना एकाच प्रॉडक्शन हाऊस बाहेर पाहून प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे की कार्तिक आणि रश्मिका मंदाना एकत्र काम करणार का ?

दरम्यान  कार्तिक आर्यन आणि क्रिती सनॉनचा लोकप्रिय चित्रपट ‘लुका छुपी’ च्या यश नंतर निर्मात्यांनी या सिनेमाचा दुसऱ्या भाग येणार असल्याचं जाहीर केलंय. अशात कार्तिक आणि रश्मिका या सिनेमासाठीच निर्मात्यांची भेट घेण्यासाठी गेल्याच्या चर्चा आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartik aryan to romance this popular actress aad