भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं काल ६ फेब्रुवारी रोजी निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार व्हॉसओव्हर आर्टिस्ट हरीश भिमानी यांनी सांगितले की लतादीदी त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या वडिलांची आठवण करत होत्या. तर हरीश भिमानी यांना ही माहिती लतादीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी दिली.

आणखी वाचा : “पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म नको कारण…”, लतादीदींचा जुना व्हिडीओ व्हायरल

लता मंगेशकर यांचे वडील एक नाट्य गायक होते. त्यांनी शेवटच्या क्षणी वडिलांच्या रेकॉर्डिंग्स मागवला होता. लतादीदी हेच रेकॉर्डिंक ऐकायच्या आणि गाण्याचा प्रयत्न करायच्या. त्या मास्क काढून गाणी गाण्याचा प्रयत्न करत होत्या आणि खरतंर असं न करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला होता. रुग्णालयात २ दिवस आधीच त्यांनी ईअरफोन मागवले होते. दीनानाथ मंगेशकर हे फक्त लतादीदींचे वडील नव्हते तर त्यांचे गुरु देखील होते.

Photo : पेडर रोडवरील प्रभाकुंज निवासस्थानातील ‘या’ घरात राहायच्या लतादीदी

लतादीदींनी त्यांच्या करिअरमध्ये ३० हजार पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. काल लतादीदींवर मुंबईतील दादर परिसरात असलेल्याशिवाजी पार्क इथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lata mangeshkar was on ventilator and whose songs did she listen in last days dcp