Video : लक्ष्मीकांत बेर्डे- माधुरी यांच्यातील २८ वर्षांपूर्वीचं बॉन्डिंग पाहून चाहते भावुक

‘हम आपके हैं कौन’ चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका बरीच गाजली होती.

laxmikant berde, madhuri dixit, hum aapke hai kaun, madhuri dixit 28 years old video, laxmikant berde video, लक्ष्मीकांत बेर्डे, माधुरी दीक्षित, हम आपके है कौन, माधुरी दीक्षित थ्रोबॅक व्हिडीओ, लक्ष्मीकांत बेर्डे व्हिडीओ, सलमान खान
सध्या सोशल मीडियावर माधुरी दीक्षित आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘हम आपके हैं कौन’ २८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा चित्रपट बराच हिट ठरला होता. सुरज बडजात्या यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या व्यक्तिरिक्त रेणुका शहाणे, मोहनीश बहल, रीमा लागू, आलोक नाथ,अनुपम खेर आणि मराठमोळा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. सध्या सोशल मीडियावर माधुरी दीक्षित आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चाहते भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षित आणि चित्रपटातील टफी डॉग शॉट देण्यासाठी तयार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. माधुरी दीक्षित दिवंगत मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत बसलेली दिसत आहे. माधुरी दीक्षित आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा २८ वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते हा व्हिडीओ पाहून भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

माधुरी दीक्षित आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हा व्हिडीओ माधुरीच्या एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. एका युजरनं या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, ‘बॉलिवूडचे सोनेरी दिवस’ दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘आजकालची पिढी कधीच समजू शकणार नाही की लक्ष्मीकांत बेर्डे किती उत्तम अभिनेता होते. भारतीय चित्रपटांतील सर्वात विनोदी कलाकारांपैकी एक.’

आणखी वाचा- Video : …अन् अचानक कियाराला उचलून घेऊन धावू लागला वरुण धवन, पाहा नेमकं काय घडलं

दरम्यान माधुरी दीक्षित हिंदी चित्रपटसृष्टीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री होती. तिने १९८४ साली ‘अबोध’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ या चित्रपटातून. सलमान खानसोबत तिचा ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट खूपच हिट झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचे असलेले रेकॉर्ड आजही अनेक हिट चित्रपटांना तोडता आलेले नाहीत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Laxmikant berde and madhuri dixit 28 years old throwback video goes viral on social media mrj

Next Story
VIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी