छोट्या पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहे. या मालिकेत यश आणि नेहाची जोडी त्यासोबत परीचा निरागस अभिनय यामुळे या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेत परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळ हिचा अभिनय असलेले एक गाणे सध्या चांगलेच चर्चेत आहे. ‘आई विना मला करमत नाही’ या गाण्याला सध्या चांगला प्रतिसादत मिळत आहे. या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचे अनेक किस्से आणि मजामस्ती केल्याचे पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या गाण्याच्या शूटींगदरम्यान मायराला तिचे सीन कसे करायचे याची माहिती दिली जात होते. यातील एका दृश्यात तिला पाण्यात जाऊन शूटींग करायचे होते. मात्र यादरम्यान मायरा फारच घाबरली होती. त्यावेळी तिला ती पाण्यात पडेल की काय अशी भीतीही वाटत होती. यामुळे ती पायात चप्पल घालूनच पाण्यात उतरली होती, असे तिने एका मुलाखतीत बोलताना सांगितले.

तसेच हे गाणं एखाद्या खेड्यातील मुलीवर चित्रीत करण्यात आलं आहे, असे दाखवणे गरजेचे होते. त्यासाठी मायराला साजेसा मेकअप करण्यात आला होता. पण यादरम्यान मायराच्या चेहऱ्यावर काळा रंग लावण्यात आला होता. यावर तिने एक मिश्किल तक्रार केली आहे.

‘मला मेकअप दादानी काळं केलं आहे. त्यामुळे आता मी त्यांना काळं करणार, अशी तक्रार मायराने बोलून दाखवली.तसेच मी आता काळी दिसत आहे. माझ्या अंगावरील हा रंग जात नाही. त्यामुळे पुढच्यावेळी मला गोरं दाखवायचं’, असे देखील ती म्हणाली. मायराने केलेल्या या तक्रारीवर अनेकजण खळखळून हसू लागले.

“द कश्मीर फाइल्समध्ये काहीही खोटं दाखवलेलं नाही”; चिन्मय मांडलेकरने मांडले रोखठोक मत

मायराच्या ‘आई विना मला करमत नाही’ या गाण्याला अल्पावधीतच प्रेक्षकांनी देखील पसंती दर्शवली आहे. कोलीवूड प्रस्तुत आई या गाण्याचे दिग्दर्शन प्रवीण कोळी यांनी केलं आहे. तर दिया वाडकर आणि स्नेहा महाडिक यांनी हे गाणं गायलं आहे. मायरासोबत अभिनेत्री अंकिता राऊत माय लेकीच्या मुख्य भूमिकेत झळकताना दिसत आहेत. हे गाणं चित्रीत होत असताना मायराने भरपूर मजामस्ती केलेली पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Myra vaikul complain about make man who made her face black during aai song nrp