Premium

मोहित रैनाच्या ‘द फ्रीलान्सर’ या वेबसीरिजचे हृतिक रोशनने केले तोंडभरून कौतुक; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

फ्रायडे स्टोरीटेलर्सची निर्मिती असलेली थ्रिलर सीरिज ‘द फ्रीलान्सर’ १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाली. ही ४ भागांची सीरिज प्रेक्षकांना खूप आवडली

hrithik-roshan-the-freelancer
फोटो : सोशल मीडिया

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन अनेकदा सोशल मीडियावर चित्रपट आणि वेब सीरिजविषयी व्यक्त होताना दिसतो. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ असो किंवा ‘द नाईट मॅनेजर’ असो, हृतिक त्याच्या भावना त्याच्या चाहत्यांबरोबर कायम शेअर करतात. आता हृतिकने नुकतंच एका व्हिडिओच्या माध्यमातून ‘हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘द फ्रीलांसर’ या मालिकेची प्रशंसा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्रायडे स्टोरीटेलर्सची निर्मिती असलेली थ्रिलर सीरिज ‘द फ्रीलान्सर’ १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाली. ही ४ भागांची सीरिज प्रेक्षकांना खूप आवडली. अन् आता हृतिक रोशनही या सीरिजचा चाहता झाला आहे. याविषयी त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत या सीरिजच्या निर्मात्यांचं अन् त्यातील कलाकारांचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा : ‘गदर २’, ‘जवान’च्या यशानंतर संजय गुप्ता यांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले “चित्रपटगृहं पुन्हा ओस पडणार…”

हृतिक या व्हिडीओमध्ये म्हणतो, “हॉटस्टारवरील नीरज पांडे, शीतल भाटिया आणि टीमची एक उत्कृष्ट कलाकृती ‘फ्रीलांसर’ नुकतीच पाहून पूर्ण केली. मला स्पेशल ऑप्स ही सीरिज सर्वोत्कृष्ट वाटायची, पण या नव्या सीरिजच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी मला आश्चर्यचकित केले आहे. एक वेगळाच थरार अनुभवायला मिळाला. अनुपम सर, मोहित कश्मिरा तुम्हा सगळ्या कलाकारांचे कामही उत्तम झाले आहे. याचे पुढील भाग पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. जर प्रेक्षकांनी ही सीरिज पहिली नसेल तर त्यांनी ती अजिबात चुकवू नये.”

‘द फ्रीलान्सर’ ही सीरिज प्रदर्शित झाल्यापासूनच प्रचंड चर्चेत आहे. या सीरिजमध्ये मोहित रैना, अनुपम खेर आणि असे इतरही उमदा कलाकार आपल्याला पाहायला मिळतील. ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही ही सीरिज पाहू शकता.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bollywood actor hrithik roshan praises the freelancer web series of mohit raina avn

First published on: 16-09-2023 at 16:37 IST
Next Story
‘ताली’ सीरिजला एक महिना पूर्ण, छोट्या गौरी सावंतनं सादर केली अप्रतिम कलाकृती, व्हिडीओनं वेधलं लक्ष