आयटम गर्ल राखी सावंत आणि कॉन्ट्रोवर्सी या एकाच नाण्याच्या दोन बाजू. राखीच्या नावासोबतच कॉन्ट्रोवर्सी, वाद ही तिच्यासाठीची विशेषणं लागूनच येतात. सध्या राखी सनी लिओनीवर केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आली आहे. राखीने सनीवर एक गंभीर आरोप केला आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सनीने तिचा मोबाइल नंबर पॉर्न इंडस्ट्रीमध्ये दिल्याचा आरोप राखीने केला आहे. राखी म्हणाली की, ‘सनीने माझा मोबाइल नंबर प्रौढ मनोरंजन उद्योगात दिला, यानंतर तिथून मला अनेक फोन येऊ लागले. ते माझ्या व्हिडिओबद्दल आणि मेडिकल सर्टिफिकेटबद्दल विचारत आहे. मला चांगली रक्कम देण्यासही ते तयार आहेत. पण मला या कामात काहीही स्वारस्य नाही. या क्षेत्रात जाण्यापेक्षा मी मरणं पसंत करेन.’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राखी पुढे म्हणाली की, ‘मी सनीला तिला जुळी मुलं झाली त्याबद्दल शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. शुभेच्छांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सनीने मला एका वेगळ्या नंबरवरुन फोन केला आणि मी तिचा मत्सर करते का असा प्रश्न सनीने मला विचारला. मी सनीचा मत्सर का करेन? बॉलिवूडमध्ये मी चांगलं काम केलं आहे. प्रेक्षक सह-कुटूंब माझा सिनेमा पाहू शकतात. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्या क्षेत्राशी निगडीत लोकांनी माझ्या मोबाइल नंबरचा गैरवापर करु नये.’

राखी सावंतने ‘बिग बॉस सिझन १’ मध्येही भाग घेतला होता. तिने अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. राखीने तिचे स्वयंवरही केले आहे. या स्वयंवराची चर्चा छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत झाली होती. राखीने तिच्या बॉलिवूड करिअरमध्ये ‘मालामाल विकली’, ‘क्रेझी ४’, ‘एक खिलाडी एक हसीना’ आणि ‘लूट’ अशा सिनेमांमध्ये हिट आयटम साँग केले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant accuses actress sunny leone of passing her phone number to porn industry