राखी सावंतने छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’मधून आणि बॉलीवूडमधील विविध सिनेमांत आयटम साँगवर डान्स करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. राखी सावंत नेहमी अनेक वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहते. आता राखी पुन्हा एक वक्तव्य करून चर्चेत आली आहे. राखी आता तिसरे लग्न करणार असून तिचा पाकिस्तानी व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा विचार असल्याचे तिने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने पाकिस्तानकडून मिळालेल्या विवाह प्रस्तावांबद्दल चर्चा केली आणि योग्य वेळ आल्यावर त्यापैकी एक निवडण्याचा विचार असल्याचे तिने सांगितले. “मला लग्नाचे खूप प्रस्ताव येत आहेत. मी पाकिस्तानला भेट दिली, त्यांना माझे आधी जे दोन विवाह झाले होते त्यात मला कशी वागणूक देण्यात आली हे माहित आहे. मला आलेल्या लग्नांच्या प्रस्तावामधून मी नक्कीच एक चांगला पर्याय निवडेन,” असे राखी सावंतने ‘ इंडिया टीव्ही’ला सांगितले. तिने असेही नमूद केले की अशा विवाहामुळे दोन्ही देशांमध्ये शांततेला चालना मिळते.

राखी पुढे म्हणाली, “भारतीय आणि पाकिस्तानी लोक एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. मला पाकिस्तानी लोक खूप आवडतात आणि माझे खूप चाहते तिथे आहेत.” तिच्या संभाव्य जोडीदाराबद्दल बोलताना तिने डोडी खानचे नाव उघड केले. तो एक अभिनेता आणि पोलीस अधिकारी आहे. पुढे राखी म्हणली, “लग्न पाकिस्तानमध्ये इस्लामिक विधींसह होईल. रिसेप्शन भारतात असेल आणि हनीमूनसाठी आम्ही स्वित्झर्लंड किंवा नेदरलँड्सला जाऊ. आम्ही दुबईमध्ये स्थायिक होऊ,” असे राखीने सांगितले.

जर राखी सावंतने डोडी खानशी लग्न केले तर ते तिचे तिसरे लग्न असेल. यापूर्वी ती आदिल खान दुर्रानीबरोबर विवाहबंधनात अडकली होती. मात्र, २०२३ मध्ये बिग बॉस फेम राखीने त्याच्यावर अनेक आरोप केले आणि त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगितले. त्यानंतर, ७ फेब्रुवारी २०२३ रोजी आदिलला राखीच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. त्याने पाच महिने तुरुंगात काढल्यानंतर त्याची सुटका झाली.

आदिलपूर्वी राखी सावंतने रितेश राज सिंगबरोबर लग्न केले होते. या जोडप्याने ‘बिग बॉस १५’ मध्ये भाग घेतला होता, पण शो संपल्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant to do third marriage with pakistani man know whom actress want to marry psg