पहिल्या पाच दिवसांत १ हजार कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा अॅव्हेंजर्स एंडगेम हा सुपरहिरोपट सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. २००७ साली आयर्नमॅन या सुपरहिरोपटापासून सुरू झालेली अॅव्हेंजर्स मालिका आज जगातील सर्वात मोठी चित्रपटमालिका म्हणून ओळखली जाते. मार्व्हल कंपनीने मिळवलेल्या या भव्यदिव्य यशामागे आयर्नमॅन व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर याचा सिंहाचा वाटा आहे. आणि या कामगिरीचे बक्षीस म्हणून आयर्नमॅनला तब्बल ५२४ कोटी रूपयांचे मानधन दिले गेले आहे. ही रक्कम बॉलिवूडमधील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाहूबलीपेक्षाही अधिक आहे. बाहूबलीच्या दोन्ही भागांच्या निर्मितीसाठी ४३० कोटी रूपये खर्च केले गेले होते. परंतु मार्व्हलने एका कलाकाराला एवढी मोठी रक्कम देऊन सर्वांनाच अचंबित केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता रॉबर्ट डाऊनी हा मार्व्हल सिनेमॅटीक युनिव्हर्ससाठी हुकुमाचा एक्का आहे असे म्हटले जाते. आजवर त्याच्याच लोकप्रियतेचा वापर करून मार्व्हलने सलग २२ सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसेच कधीकाळी मार्व्हल कंपनी कर्जबाजारी झालेली असताना त्याने ही कंपनी वाचवण्यासाठी कोट्यावधींची गुंतवणूक केली होती. या मदतीची परतफेड म्हणून २००७ ते २०१९ दरम्यान आलेल्या प्रत्येक चित्रपटाच्या नफ्याचा एक हिस्सा रॉबर्ड डाऊनीला दिला जातो. अॅव्हेंजर्स एंडगेमचा पहिला भाग अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरसाठी त्याला मानधन म्हणून २१६ कोटी रूपये देण्यात आले होते. शिवाय चित्रपटाच्या एकूण नफ्यामधून ७३६ कोटी रूपये देण्यात आले होते. त्यामुळे आजच्या तारखेला रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर हा जगातील सर्वात महागडा अभिनेता म्हणून ओळखला जातो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robert downey jr is the highest paid actor