संपूर्ण देशातील चित्रपट रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता प्रभास सध्या बऱ्याच कारणांनी चर्चेत आहे. पण, या सर्व कारणांमध्येही त्याच्या आगामी चित्रपटाच्याच चर्चा सर्वात जास्त रंगत आहेत. त्यामागचे कारणही तसंच आहे. ‘बाहुबली २’ला मिळालेल्या यशानंतर प्रभासच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाली. ज्यामुळे प्रेक्षकांच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षाही वाढल्या. याच वातावरणात त्याच्या ‘साहो’ या चित्रपटाविषयीची माहिती सर्वांसमोर उघड होऊ लागली. चित्रपटातील प्रभासच्या पहिल्या लूकपासून ते अगदी त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याच्या शर्यतीत समाविष्ट असलेल्या अभिनेत्रींच्या नावांचाही बराच गाजावाजा झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशा या बहुचर्चित चित्रपटाबद्दल सध्या आणखी एक माहिती समोर येतेय. ‘इंडियन एक्प्रेसने’ प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार प्रभासची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘साहो’ या चित्रपटात चंकी पांडे आणि जॅकी श्रॉफ यांच्यामागोमाग आता मराठमोळे अभिनेते महेश मांजरेकरही झळकणार असल्याचं म्हटलं जातंय. हिंदी- मराठी चित्रपसृष्टतील काही प्रसिद्ध चेहऱ्यांच्या नावांसोबतच या चित्रपटामध्ये मल्ल्याळम चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेता मोहनलाल आणि अरुण विजयसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय.

पाहा : सलमान, हृतिकला टक्कर देतोय हा आयपीएस अधिकारी

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

तगडी स्टारकास्ट आणि प्रत्येक अभिनेत्याचा प्रेक्षकवर्ग पाहता त्याचा या चित्रपटाच्या लोकप्रियतेमध्ये बराच फायदा होईल ही बाब नाकारता येणार नाही. सध्या ‘साहो’चं चित्रीकरण सुरु झालं असून, या अॅक्शपटासाठी प्रभासने बरीच मेहनत घेतल्याचं म्हटलं जातंय. ‘साहो’ हा आतापर्यंतचा बहुचर्चित अॅक्शनपट ठरतोय. कारण चित्रपटातील काही थरारक दृश्यांसाठी जागतिक पातळीवरील प्रसिद्ध अॅक्शन कोरिओग्राफर्सची निवड करण्यात आली असून, तेसुद्धा यात फार योगदान देत आहेत. प्रभासचा हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगु या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saaho movie after shraddha kapoor jackie shroff marathi actor mahesh manjrekar and malayalam actor mohanlal join the project