सलमान खान याचा ‘टायगर जिंदा है’ सिनेमाचे चित्रिकरण अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या अबूधाबीमध्ये या सिनेमाचे चित्रिकरण सुरू आहे. क्लायमॅक्सचा सीन चित्रित केला जात आहे. दरम्यान, ‘टायगर जिंदा है’चा दिग्दर्शक अली अब्बास जफरने सलमान आणि कतरिनाचा एक क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये सलमान अगदी निवांत बसला असून तो कतरिनाला एकटक पाहताना दिसत आहे. त्याच्या बाजूला उभी असलेली कतरिना मात्र सूर्यास्ताचे फोटो काढण्यात मग्न आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सीपीएल’वरुन सोशल मीडियावर प्रिती झिंटा ट्रोल!

अली अब्बासने या दोघांच्या फोटोला ‘झक्कास’ कॅप्शन दिली आहे. ‘झोया सूर्यास्ताचे फोटो घेताना टायगर तिच्याकडे पाहतोय. थोड्याच दिवसांत सिनेमाचे चित्रिकरण संपणार आहे.’ सिनेमाचे काही दिवसांचेच चित्रिकरण राहिले आहे. सेटवर प्रत्येक जण कामासोबतच खूप मस्ती करतानाही दिसतो. कतरिना तर सेटवर क्रिकेट खेळायला सर्वाधिक प्राधान्य देताना दिसते. काही दिवसांपूर्वी कतरिनाचा गल्ली क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती गोलंदाजी करताना दिसतेय. कतरिनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. कतरिनासोबत यावेळी अंगद बेदीही गोलंदाजी करत होता.

‘टायगर जिंदा है’ या सिनेमातून सलमान खान आणि कतरिना कैफ ही जोडी कमबॅक करणार आहे. ‘एक था टायगर’ या त्यांच्या गाजलेल्या सिनेमाचा हा सिक्वल आहे. अंगद बेदीचीही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे ‘एक था टायगर’ हा सिनेमा संपवण्यात आला होता, तिथून ‘टायगर जिंदा है’चे कथानक पुढे सरकणार आहे. अली अब्बास झफर दिग्दर्शित हा सिनेमा या वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan and katrina kaif film tiger zinda hai war sequence big boss