कुमारवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या आरोपावरून फरार असलेली अभिनेत्री सना खान गुरुवारी अखेर ठाणे सत्र न्यायालयात हजर झाली. तिच्या अंतरीम जामीनावरील सुनावणी न्यायालयाने एक दिवस पुढे ढकलली आहे. त्यामुळे सना खान हिला शुक्रवारी पुन्हा ठाणे न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. तसेच या प्रकरणातील साक्षी पुरावे शुक्रवारी न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने तुर्भे पोलिसांना दिले आहेत.
सना खान हिच्याविरोधात एका पंधरा वर्षिय मुलीचे अपहरण केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरप्रकरणी गुन्हा दाखल होताच सना गेल्या काही दिवसांपासून फरार होती. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय मुलीचे नावेद नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. तो सनाचा निकटवर्तीय आहे. मुलीच्या कुटूंबियांनी लग्नास नकार दिला होता. त्यामुळे सना खान हिने आपल्या भावाच्या मदतीने त्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मुलीच्या कुटूंबियांनी गेल्या महिन्यात सना खान विरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sana khan present before the court