बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘रेस ३’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अभिनेता सलमान खान प्रचंड मेहनत करत असून तो याच कामात व्यग्र असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसापूर्वीच ‘रेस ३’ मधलं पहिल गाणं प्रदर्शित झालं होतं. मात्र या गाण्याला प्रेक्षकांकडून म्हणावा तसा विशेष प्रतिसाद मिळाला नव्हता. या गाण्याला ट्रोलदेखील करण्यात आलं होतं. परंतु आता या चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आतिफ अस्लम आणि युलिया वंतूर यांनी गायलेलं ‘सेल्फिश’ हे गाणं आज प्रदर्शित झालं असून या गाण्यात सलमान खान, बॉबी देओल आणि जॅकलिन फर्नांडिस हे झळकले आहेत. ‘सेल्फिश’ गाणं रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच ते लोकप्रिय ठरले असून सलमान खानने ‘गाना डॉट.कॉम’वर हे गाणं रिलीज केलं आहे. ‘सेल्फिश’ गाण्यातील काही बोल सलमान खानने लिहीले आहेत. या गाण्याला युट्युबरवर आतापर्यंत २ कोटी ६० लाख व्ह्युज मिळाले आहेत.

दरम्यान, ‘सेल्फिश’ या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्यावर काही नेटक-यांनी टीका केली होती. या गाण्यातील युलियाचा आवाज प्रेक्षकांच्या पसंतीत न उतरल्यामुळे त्यांनी युलियावर टीका केली होती. या गाण्यासाठी युलियाच्याऐवजी दुस-या कोणत्यातरी गायिकेची निवड करायला हवी होती, असा सल्लाही काही युजर्सनी सलमान खानला दिला.  हे गाणं काश्मीरमध्ये चित्रीत करण्यात आलं आहे.

दरम्यान, ‘रेस ३’ चा ट्रेलर प्रदर्शनाच्या वेळीदेखील असाच प्रसंग घडला होता. या चित्रपटाचा ट्रेलर काही प्रेक्षकांना आवडला होता. तर काही प्रेक्षकांनी टीकास्त्र सोडले होते. मात्र, भाईजाननेही त्याच्या अनोख्या शैलीत ट्रोलक-यांना उत्तर दिले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने यामध्ये जॅकलीन फर्नांडिस,बॉबी देओल, अनिल कपूर आणि डेजी शहा हे स्क्रिन शेअर करणार आहेत. हा चित्रपट येत्या १५ जूनला म्हणजेच ईदला प्रदर्शित होणार आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selfish song release salman khan race 3 jacqueline fernandez