छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. सध्या बिग बॉसचे १५वे पर्व सुरु आहे. गेल्या काही दिवसात या शोच्या पर्वाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वी राकेश बापट आणि अफसाना खान या दोन स्पर्धकांनी हा खेळ सोडला होता. त्यानतंर आता अभिनेत्री शमिता शेट्टीही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शमिताची प्रकृती खालावल्याने तिला घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉसच्या अनेक फॅन पेजेसवर सध्या शमिता शेट्टी ही शोमधून बाहेर पडल्याच्या बातम्या व्हायरल होत आहे. याचे कारण एलिमिनेशन नसून शमिता शेट्टीची तब्येत असल्याचे सांगितले जात आहे. शमिताला मेडिकल उपचारासाठी घराबाहेर आणण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या मंगळवारी आणि बुधवारी उपचार घेतल्यानंतर ती शो मध्ये पुन्हा परतणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

शमिताच्या आधी या शो मधून राकेश बापट हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. प्रकृती खालावल्यामुळे राकेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी राकेशची ‘बिग बॉस १५’च्या घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. त्याला पाहून शमिता शेट्टीला आनंद झाला होता. तिने राकेशला मिठी मारली होती.

ईटाइम्सला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबरला रात्री अचानक राकेशला वेदना असह्य होऊ लागल्यामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा डॉक्टरांनी किडनी स्टोनमुळे वेदना होत असल्याचे सांगितले. तसेच राकेश लवकर बरा होऊन पुन्हा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकतो अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shamita shetty out of bigg boss 15 show due to medical emergency nrp