सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी आकस्मिक निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. मोहित मारवाह आणि अंतरा मोतीवाला यांच्या लग्नसमारंभासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी कपूरबरोबर दुबईला गेल्या होत्या. शनिवारी रात्री कार्डिअॅक अरेस्टने त्यांचे निधन झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीदेवी यांच्या आकस्मात मृत्यूमुळे सिनेसृष्टीबरोबरच त्यांच्या चाहत्यांनाही जबरदस्त धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अनेकांनी ट्विट करुन आणि समाजमाध्यमांवरून श्रीदेवी यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे. यामध्ये अनेक नेटकऱ्यांनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. गायक सोनू निगम याने पोस्ट केलेल्या व्हिडीओत त्याने हा श्रीदेवी यांचा शेवटचा व्हिडीओ असे कॅप्शन देऊन त्या लग्न समारंभात दाखल होतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर सध्या त्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मोहित मारवाहच्या रिसेप्शन पार्टीतील हा व्हिडिओ असून श्रीदेवी नातेवाईकांसोबत डान्स करताना पाहायला मिळत आहेत.

वाचा : श्रीदेवी ठरल्या असता हॉलिवूडच्या सिनेमात झळकणाऱ्या पहिल्या बॉलिवूड अभिनेत्री पण…

काय आहे या व्हिडीओमध्ये…

३४ सेकंदांचा हा व्हिडीओ श्रीदेवी यांना ज्या दिवशी हृदयविकाराचा झटका आला त्याच दिवशीचा म्हणजे शनिवारी संध्याकाळचा असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये त्या नातेवाईकांसोबत डान्स फ्लोअरवर ‘काला चष्मा..’ या पार्टी साँगवर नाचताना दिसत आहेत. श्रीदेवीसुद्धा गाण्याचा पुरेपूर आनंद घेत लग्न समारंभाचा आनंद लुटत असताना पाहायला मिळत आहेत. व्हिडीओच्या शेवटच्या श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर त्यांच्या मागून येऊन डान्समध्ये सहभागी होताना दिसतात. दोन तीन स्टेप्सनंतर श्रीदेवी मागे वळून आपल्या पतीला मिठी मारते आणि समोरील एक वयस्कर स्त्री बोटं मोडून त्यांची नजर काढताना या व्हिडीओत दिसत आहे.

पाहा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ…

https://twitter.com/TheLegendChap/status/967658502058541056

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sridevi last dance with boney kapoor in dubai video viral