छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर ही कायमच चर्चेत असते. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे तिला घराघरात एक वेगळीच लोकप्रियता मिळाली. नुकतंच अरुंधतीने तिला लहानपणापासून आवडणाऱ्या एका गोष्टींबद्दलचा खुलासा केला आहे. याबद्दल तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
मधुराणी प्रभुलकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. मधुराणीने शेअर केलेला हा व्हिडीओ तिच्या लेकीनेच कॅमेऱ्यात कैद केला आहे. या व्हिडीओ ती एका झोपाळ्यावर झोके घेताना दिसत आहे. यावेळी ती फारच आनंदित असल्याचे पाहायला मिळत आहे. याबद्दल तिने त्याला एक कॅप्शनही दिले आहे.
मधुराणी प्रभुलकरची पोस्ट
“झोका…झोपाळा, झुला लहानपणापासून मला वेड आहे ह्याचं.
उंच उंच झोके घ्यायला मला प्रचंड मजा येते. झोक्यावर मी अक्षरशः मला विसरते. आणि तेच वेड माझ्या लेकीमध्ये पण आलंय.
आपला जीव दडपावा इतके उंच झोके ती घेते. हा व्हिडीओ पण तिनीच काढलाय. तिलाही ह्यातलं सुख कळलंय….. ह्याचं मला सुख आहे”, असे मधुराणी प्रभुलकरने या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
मधुराणी प्रभुलकरची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांच्या कमेंट पाहायला मिळत आहे. यावर कमेंट करताना एकाने अशाच आनंदी रहा मायलेकी, असे म्हटले आहे. तर काहींनी खूप सुंदर, मस्त अशा कमेंट केल्या आहेत.