मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. मराठीबरोबरच अनेक हिंदी रिॲलिटी शो आणि चित्रपटांमध्येही ती झळकली आहे. त्यामुळे हिंदी सिनेसृष्टीतही तिचा दबदबा पाहायला मिळतो. सध्या ती तिच्या ‘गणराज गजनान’ या गाण्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच अमृताने मराठीतील काही रिअॅलिटी शोबद्दल स्पष्टपणे भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमृताने नुकतंच ‘गणराज गजनान’ या गाण्यामुळे चर्चेत आहे. या गाण्याद्वारे तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. याच निमित्ताने अमृताने एका रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी कलाकारांना गृहीत धरलं जातं, असं तुला वाटतं का? आणि त्याबद्दल तू काय सांगशील? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने काही कार्यक्रमांवर अप्रत्यक्षरित्या टीका केली.
आणखी वाचा : “आता आमच्यात प्रेम…” अमृता खानविलकरचे पती हिमांशूबरोबरच्या नात्याबद्दल थेट वक्तव्य, म्हणाली “ते रिलेशन…”

“एक कलाकारही शेवटी माणूसच असतो. त्यामुळे त्याला त्याचा आदर, सन्मान द्यायला हवा. मी खूप काम केलंय आणि मला हे हवं आहे, असं मी म्हणत नाही. पण आपण जरा सुसंस्कृतपणे वागलं पाहिजे. आम्ही कलाकार अनेकदा प्रमोशनसाठी एखाद्या कार्यक्रमात जातो. तिथे सतत कलाकारांची टिंगल-टवाळी केली जाते, हे मला अजिबात आवडत नाही. कृपया हे करु नका”, असे अमृता खानविलकर म्हणाली.

आपल्या मराठी सिनेसृष्टीत हे खूप होतं. तुम्ही मजेमजेत त्या कलाकाराची इतकी थट्टा करतात की एका ठराविक वेळेनंतर ते डोक्यात जायला लागतात. मला ते अजिबातच आवडत नाही. कारण मी कधीच कोणाची इतकी थट्टा करत नाही. मी कोणालाही इतकं बोलतं नाही की त्या माणसाला वाईट वाटेल. त्यामुळे कोणालाही वाईट वाटेल, असं वागत जाऊ नका, असाही सल्ला अमृता खानविलकरने या कार्यक्रमांना दिला.

आणखी वाचा : “…अन् अमृता खानविलकरने मला खूप शिव्या घातल्या”, प्राजक्ता माळीने सांगितला ‘रानबाजार’ सीरिजचा किस्सा, म्हणाली…

दरम्यान अलीकडेच अमृताचे ‘गणराज गजानन’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. लवकरच ती बहुचर्चित ‘कलावती’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress amruta khanvilkar comment on marathi reality and comedy show said dont do that nrp