divya agrawal open up about boyfriend apoorva padgaonkar | "वरुणशी ब्रेकअप झाल्यानंतर अपूर्व..." बॉयफ्रेंडचं कौतुक करत दिव्या अग्रवालने दिलं ट्रोलर्सना उत्तर | Loksatta

“वरुणशी ब्रेकअप झाल्यानंतर अपूर्व…” बॉयफ्रेंडचं कौतुक करत दिव्या अग्रवालने दिलं ट्रोलर्सना उत्तर

दिव्याचा एक्स बॉयफ्रेंड वरुण सूद आणि अपूर्व यांच्यात तुलना करत नेटकऱ्यांनी वरुण अपूर्वपेक्षा उत्कृष्ट असल्याचं म्हटलं होतं

“वरुणशी ब्रेकअप झाल्यानंतर अपूर्व…” बॉयफ्रेंडचं कौतुक करत दिव्या अग्रवालने दिलं ट्रोलर्सना उत्तर
(फोटो सौजन्य- दिव्या अग्रवाल, वरुण सूद इन्स्टाग्राम)

बिग बॉस ओटीटीची विजेती दिव्या अग्रवालने सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच बिझनेसमन बॉयफ्रेंड अपूर्व पाडगांवकरशी साखरपुडा केला आहे. तिने अचानक साखरपुड्याची घोषणा करत दिव्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. अपूर्वशी साखरपुडा केल्यानंतर तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. दिव्याचा एक्स बॉयफ्रेंड वरुण सूद आणि अपूर्व यांच्यात नेटकऱ्यांनी तुलना करत वरुण अपूर्वपेक्षा उत्कृष्ट असल्याचं म्हटलं होतं. आता दिव्याने अपूर्वशी असलेलं नातं आणि ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखतीत दिव्या अग्रवालने अपूर्वशी असलेल्या नात्यावर भाष्य केलं. याचबरोबर अपूर्वला आपण बऱ्याच वर्षांपासून ओळखत असल्याचंही तिने या मुलाखतीत सांगितलं. वरुण सूदशी ब्रेकअप झाल्यानंतर अपूर्वने आपल्याला खंबीरपणे साथ दिल्याचा खुलासाही दिव्याने केला आहे आणि याचबरोबर ट्रोलर्सना सडेतोड उत्तरही दिलं आहे. अपूर्वबद्दल लोक काय बोलतात याने मला फारसा काही फरक पडत नाही कारण माझ्या कठीण काळात त्याने मला मोलाची साथ दिली आहे. हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे असं अपूर्वा यावेळी म्हणाली.

आणखी वाचा-दिव्या अग्रवालच्या साखरपुड्यानंतर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत दिव्या म्हणाली, “आयुष्य गोल आहे. मी अपूर्वला खूप आधीपासून ओळखत होते. आम्ही २०१५ ते २०१८ च्या दरम्यान एकमेकांना डेट केलं होतं. पण नंतर आम्ही वेगळे झालो. मात्र एकमेकांच्या संपर्कात होतो. अपूर्व नेहमीच माझा एक चांगला मित्र राहिला आहे. ज्याच्याकडे मी कधीही जाऊन माझी समस्या शेअर करू शकते.”

वरुण सूदशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलताना दिव्या म्हणाली, “मार्च २०२२ मध्ये वरुणशी माझं ब्रेकअप झालं. त्यानंतर माझ्या आयुष्यात बऱ्याच समस्या आल्या. पण यावेळी अपूर्व मात्र एका बेस्ट फ्रेंडप्रमाणे माझ्याबरोबर होता. मला त्याच्याकडून कोणत्याही प्रपोजलची अपेक्षा नव्हती मात्र माझ्या मनात होतं की अपूर्व तसाच मुलगा आहे जशा मुलाशी मला लग्न करण्याची इच्छा आहे.”

आणखी वाचा- दिव्या अग्रवालच्या मराठमोळ्या बॉयफ्रेंडने दिलेल्या अंगठीने वेधलं सर्वांचेच लक्ष, अंगठीवर लिहिलंय…

अपूर्वशी लग्न करण्याच्या प्लॅनिंगबद्दल विचारल्यानंतर दिव्याने पुढच्या वर्षभरात लग्न करण्याचा विचार करत असल्याचं स्पष्ट केलं. ती लग्नाबद्दल बोलताना म्हणाली, “आम्ही अजून लग्नाची कोणतीही तारीख ठरवलेली नाही. मात्र पुढच्या वर्षी आम्ही लग्न करणार आहोत. माझ्या आयुष्यात कोणतीही गोष्ट प्लॅनिंगनुसार झालेली नाही. सध्या मी माझ्या आयुष्याचा आनंद घेऊ इच्छिते.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 18:41 IST
Next Story
TRPच्या शर्यतीत बिग बी, कपिल शर्माचा शो पडला मागे; ‘या’ मालिकेने पटकावला पहिला क्रमांक