शिवा आणि आशूची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. ‘शिवा'(Shiva) या मालिकेतील पात्रांच्या वेगळेपणामुळे त्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना दिसते. शिवा ही न लाजणारी, रोखठोक स्पष्ट बोलणारी, कोणत्याही संकटाचा सामना खंबीरपणे करणारी, तर दुसरीकडे आशू हा थोडासा लाजरा असा दाखवला आहे. आता या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झी मराठी वाहिनीने ‘शिवा’ मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सुरुवातीला पाहायला मिळते की आशू खूप आनंदात आहे. तो गाडीत बसून शिवाकडे जायला निघतो. दुसरीकडे पाना गँग शिवाच्या डोळ्याला पट्टी बांधून तिला एका सजवलेल्या झोपाळ्यावर बसवतात. शिवादेखील सुंदर साडी नेसून तयार झालेली दिसत आहे. पाना गँग तिला तिथे बसवून तिथून निघून जाते. ती वाट बघत असलेली दिसत आहे. दुसरीकडे आशू काही गोष्टी आठवून लाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. या दरम्यान त्याच्या गाडीसमोर कोणीतरी येते आणि तो ब्रेक मारतो. गाडीतून बाहेर येऊन बघतो तर ती शिवाची बहीण दिव्या असते. तिला समोर पाहून आशू म्हणतो, “मूर्ख आहेस तू?”, दिव्या त्याच्यासमोर एक चिठ्ठी धरते आणि म्हणते, “हे शिवाला देशील?”, आशू तिला, “काय आहे हे?” असे विचारतो, पण ती निघून जाते. आशू ती चिठ्ठी उघडून बघतो आणि त्याचा चेहरा गंभीर होतो. तिकडे शिवा वाट बघत असल्याचे दिसत आहे.

इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्या कोणतं नवीन विघ्न आणणार…?” अशी कॅप्शन दिली आहे.

काय म्हणाले नेटकरी?

हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “ही मालिका खूप भारी चालली आहे. ही घटना घडल्यावर आशूच्या मनावर काहीच परिणाम होणार नाही, हेच दाखवा म्हणजे भारीपणा टिकून राहील”, “कृपया आता काही नवीन दाखवू नका, शिवाचा वाढदिवस खराब करू नका”, “या सगळ्याची गरज होती का? आशू प्रपोज करायला जातोय आणि दिव्या मध्येच मांजरीसारखी आडवी आली”, “या दिव्याचा प्रॉब्लेम काय आहे? एकतर स्वत:ला चंदनवर प्रेम करता आलं नाही आणि आता आशु व शिवाच्या लव्ह स्टोरीमध्ये अडथळा आणतेय”, “मला वाटलंच होतं ही दिव्या मध्ये येणार”, “नको करू बाबा या बावळटला मदत”, “प्लीज ही तरी मालिका चांगली राहू द्या. बाकीच्या मालिकांची वाट लावली आहेच, या मालिकेत असे काही नको .”

हेही वाचा: ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”

आता दिव्या नक्की काय करणार आहे, त्या चिठ्ठीमध्ये नक्की काय लिहिले आहे, आशू शिवाला प्रपोज करणार का, मालिकेत पुढे काय होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Divya tries interfere in aashu shiva love story after watching promo netizens request to makers nsp