सुव्रत जोशी हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे अभिनेता प्रसिद्धीझोतात आला. याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ताली’ या वेब सीरिजमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. सुव्रतच्या या भूमिकेचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. मराठी कलाविश्वात पदार्पण करण्यापूर्वी तो अनेक वर्ष दिल्लीत राहायचा. त्यामुळे दिल्लीतील बऱ्याच जागा सुव्रतला माहिती आहेत. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’मधील पूर्णा आजी आहेत ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीच्या आई, पाहा त्यांचे Unseen फोटो

दिल्लीतील एका नामांकित उपहारगृहाचा उल्लेख करत सुव्रतने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. राजधानी दिल्लीत छोले भटुरे हा पदार्थ प्रचंड लोकप्रिय आहेत. मुंबईत आल्यावर वडापाव आणि दिल्लीला गेल्यावर छोले भटुरे खावेत असं नेहमी सांगितलं जातं. हेच छोले भटुरे विकणाऱ्या एका नामांकित उपहारगृहातील कार्यपद्धतीवर अभिनेत्याने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

हेही वाचा : Video: प्रार्थना बेहेरे मुंबई सोडून कायमची राहायला गेली निसर्गाच्या सानिध्यात, म्हणाली, “मला वाटायचं की मुंबईत…”

सुव्रत जोशी पोस्टमध्ये लिहितो, “संबंधित उपहारगृहात सर्वात सुंदर छोले भटुरे मिळतात यात काहीच वाद नाही. परंतु, या ठिकाणी मी काही लहान मुलांना काम करताना पाहिलं. बालकामगार प्रतिबंध कायद्याचे ते नियम पाळतात की नाही? याबद्दल मला शंका आहे. २१ व्या शतकात दिल्लीमध्ये या गोष्टी सुरू आहेत… जिथे G20 कार्यक्रमाचे पोस्टर सुद्धा झळकत आहेत. एवढ्या प्रसिद्ध उपहारगृहात सुरू असलेली ही गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नाही?”

“संबंधित उपहारगृहातील एका कर्मचाऱ्याशी माझं बोलणं झालं. त्याने मला सांगितलं, ती मुलं त्याची आहेत, हे ऐकल्यावर त्याच्याजवळ मी मालकाला सांगून त्यांना शाळेत पाठवण्याची व्यवस्था कर असा आग्रह धरला. त्यांचा मालक लाखो रुपये कमावतो (कदाचित कोटी) आणि अशा लहान मुलांना कामावर ठेवणं त्याला लज्जास्पद वाटलं नाही का? जेव्हा मी मालक कुठे आहे याबाबत विचारणा केली, तेव्हा अर्थात तो कामासाठी बाहेर गेला होता. मी पुन्हा त्याठिकाणी छोले भटुरे खाण्यासाठी जाणार नाही!” असं सुव्रतने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा : दाक्षिणात्य सुपरस्टारसह जान्हवी कपूर करणार रोमान्स, तर सैफ अली खान साकारणार ‘ही’ भूमिका, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

सुव्रत जोशी

दरम्यान, सुव्रत जोशीने अलीकडेच सुश्मिता सेन प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘ताली’ सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यापूर्वी त्याने ‘IB 71’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor suvrat joshi shared post on instagram about famous hotel in delhi sva 00