scorecardresearch

Premium

दाक्षिणात्य सुपरस्टारसह जान्हवी कपूर करणार रोमान्स, तर सैफ अली खान साकारणार ‘ही’ भूमिका, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

दिग्दर्शक कोरतला शिवा यांनी ‘देवरा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख केली जाहीर

junior ntr saif ali khan and janhvi kapoor starrer telugu film devara
चित्रपट दिग्दर्शक कोरतला शिवा यांनी 'देवरा' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख केली जाहीर

‘बाहुबली’, ‘केजीएफ’ आणि ‘पुष्पा’ या ब्लॉकबस्टर, सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांनंतर ज्युनिअर एनटीआरचा ‘देवरा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या तेलुगू चित्रपटात अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री जान्हवी कपूर झळकणार आहे. या चित्रपटाबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

हेही वाचा – Sindhutai Maazi Maai: ‘राज रानीची गं जोडी’ फेम अभिनेत्री झळकणार सिंधुताईंच्या भूमिकेत; पाहा मालिकेचा नवा प्रोमो

kabhi-haan-kabhi-naa
‘कभी हां कभी ना’च्या रिमेकमध्ये शाहरुख खानची भूमिका कुणी करावी? सूचित्रा कृष्णमूर्ती म्हणाल्या, “हे पात्र…”
film director Kumar Shahani passed away
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे निधन; कलात्मक हिंदी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा दुवा निखळला
Shivrayancha Chhava Movie Review
Shivrayancha Chhava Movie Review : अतिरंजक शौर्यगाथा
snehal sidham in Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
वनिता खरात, प्रियदर्शनीनंतर शाहीद कपूरच्या चित्रपटात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी! म्हणाली, “कळवायला उशीर…”

ज्युनिअर एनटीआरचा आगामी ‘देवरा’ चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा चित्रपटाचे दिग्दर्शक कोरतला शिवा यांनी बुधवारी एक व्हिडीओ शेअर करत दिली आहे. चित्रपट निर्मिती संस्था युवासुधा आटर्सने हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

हेही वाचा – मालिकाविश्वातील ‘हा’ लोकप्रिय अभिनेता ‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेणार; व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक कोरतला म्हणाले की, “भारताच्या किनारपट्टी जवळच्या विसरलेल्या भूमीबद्दलचा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा कॅनव्हास खूप मोठा आहे. चित्रपटाच्या शूटिंगनंतर चित्रपटाच्या कॅनव्हासवरून कळालं की, चित्रपट खूप मोठा होत आहे. चित्रपटातील प्रत्येक पात्राला एक विशिष्ट महत्त्व आहे, हेच विस्तृत स्वरुपात दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळे एकाच चित्रपटातून याला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही हे मोठं कथानक दोन भागांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.”

हेही वाचा – केतकी माटेगावकरचं पहिलं लग्न कोणाबरोबर झालंय? जाणून घ्या…

हेही वाचा – “भर पार्टीत शाहरुख खानने माझा हात धरला अन्…” गिरीजा ओकने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली…

‘देवरा’ चित्रपटाचा पहिला भाग ५ एप्रिल २०२४ ला प्रेक्षकांसाठी भेटीस येणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान खलनायकाची भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तसेच अभिनेत्री जान्हवी कपूर ज्युनिअर एनटीआरबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Junior ntr saif ali khan and janhvi kapoor starrer telugu film devara first part release date announce pps

First published on: 05-10-2023 at 11:22 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×