मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखलं जातं. तिने आतापर्यंत तिच्या अभिनय कौशल्याने सर्वांचीच मन जिंकून घेतली आहेत. ती तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींमुळेही चर्चेत असते. तर तिचं अशोक सराफ व निवेदिता सराफ यांच्याशी असलेल्या बॉण्डिंग नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असतं. ती त्या दोघांना आई-वडिलांसमान मानते. आता अशोक सराफ व निवेदिता सराफ यांच्याकडून सायली संजीवला एक खास भेट मिळाल्याचं तिने सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सर्वत्र ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ची चर्चा आहे. आज हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. पुरस्कार सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. सायली संजीव देखील उपस्थित होती. तर यावर्षीचा झी तर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यातील सायलीचा लूकही खूप चर्चेत आला. यावेळी तिने जांभळ्या रंगाची पैठणी नेसली होती. तर ही पैठणी तिला अशोक सराफ व निवेदिता सराफ यांनी भेट म्हणून दिली आहे असा खुलासा तिने केला.

आणखी वाचा : स्पृहा जोशी व सायली संजीव एकमेकींना ‘ताई’ का म्हणतात? गुपित उघड करत अभिनेत्री म्हणाली…

या पुरस्कार सोहळ्यादरम्यान ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “आज मी जी पैठणी नेसली आहे त्याची खासियत अशी आहे की ही साडी मला अशोक पप्पा व निवेदिता मम्मा यांनी दिली आहे. त्यांनी ही साडी खास माझ्यासाठी विणून घेतली होती त्यामुळे ती माझ्यासाठी आणखीन स्पेशल आहे. आतापर्यंत त्यांनी मला कधीही या साडीत पाहिलेलं नाही त्यामुळे मी आज खास ही साडी त्यांना दाखवायला नेसून आले आहे.”

हेही वाचा : “मी ज्यांना प्रपोज केलं त्यांनी…”; सायली संजीवचा प्रेमाबद्दल मोठा खुलासा

त्यामुळे तिचं हे बोलणं आता सध्या खूप चर्चेत आलं असून यावर तिचे चाहते प्रतिक्रिया देत तिच्या लूकचं त्याचबरोबर अशोक मामा व निवेदिता सराफ त्यांच्याबरोबर असलेल्या सायलीच्या बॉण्डिंगचं कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sayali sanjeev revealed that ashok sadaf and nivedita sadaf gifted her a paithani saree rnv