Star Pravah Parivaar Puraskar 2025 : छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. एखाद्या मालिकेच्या यशामागे प्रमुख कलाकारांसह संपूर्ण टीम आणि क्रू मेंबर्सचा हात असतो. त्यामुळे या कलाकारांचा वर्षातून एकदा सन्मान करण्यासाठी वाहिन्या पुरस्कार सोहळे आयोजित करतात. सध्याच्या घडीला ‘स्टार प्रवाह’ वाहिनी टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर आहे. वाहिनीने नुकतीच त्यांच्या पुरस्कार सोहळ्याची घोषणा केलेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर यंदा पुरस्काराच्या शर्यतीत ‘साधी माणसं’, ‘मुरांबा’, ‘शुभविवाह’, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’, ‘उदे गं अंबे’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘ठरलं तर मग!’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’, ‘येड लागलं प्रेमाचं’, ‘तू ही रे माझा मितवा’ आणि ‘अबोली’ अशा एकूण १४ मालिका असणार आहेत. आता या मालिकांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पुरस्कार सोहळा केव्हा असेल?

‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा पुरस्कार सोहळा येत्या १६ मार्चला संध्याकाळी ७ वाजता संपन्न होणार आहे. यासाठी सगळ्याच मालिकांमध्ये चुरस रंगणार आहे. तर, मालिकांमधले लोकप्रिय कलाकार या सोहळ्यात परफॉर्मन्स सुद्धा सादर करतील. त्यामुळे प्रेक्षक या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीने पुरस्कार सोहळ्याची घोषणा करताच नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “उत्कृष्ट मालिका ठरलं तर मग होईल”, “अरे वाह किती दिवसांपासून वाट पाहत होतो”, “यावेळी नंबर १ लक्ष्मीच्या पाऊलांनी होईल”, “लक्ष्मीच्या पावलांनी हिच मालिका ठरणार महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट मालिका… कलाद्वैत फक्त”, “साधी माणसं बेस्ट कपल जोडी”, “खलनायिका प्रियाला मिळायला पाहिजे”, “चैतन्यला पण अवॉर्ड द्या”, “१४ मालिका आहेत त्यामुळे आता नॉमिनेशनला मजा येणार” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या पोस्टवर दिल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स ( Star Pravah Parivaar Puraskar 2025 )

दरम्यान, गेल्यावर्षीच्या Star Pravah Parivaar पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राची महामालिका ‘ठरलं तर मग’ ठरली होती. आता यंदा यामध्ये कोण बाजी मारणार?, सर्वोत्कृष्ट नायक व नायिका कोण होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Star pravah channel announce the date of star pravah parivaar puraskar ceremony netizens predicts winner sva 00