Leo trailer : तमिळ सुपरस्टार थलपथी विजय त्याच्या आगामी ‘लिओ’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते अत्यंत आतुरतेने वाट बघत होते. अखेर आज संध्याकाळी निर्मात्यांनी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी गुरुवारी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला असला तरी अद्याप याचा हिंदी ट्रेलर समोर आलेला नाही. ‘लिओ’च्या फर्स्ट लुकमध्ये थलपती विजय ज्या डॅशिंग अवतरात दिसला होता तसाच त्याचा हा दमदार लुक चाहत्यांना जबरदस्त आवडला आहे.

आणखी वाचा : कार अपघात प्रकरणी गायत्री जोशीचे पती विकाश ओबेरॉय यांची चौकशी सुरू; दोषी आढळल्यास होऊ शकते ७ वर्षांची शिक्षा

चित्रपटाची कथा ‘लिओ’च्या भोवती फिरताना दिसत जरी असली तरी यात आणखी बरीच पात्र अन् त्यांचा एक वेगळा भूतकाळ पाहायला मिळणार आहे. लोकेश कनगराजच्या ‘कार्थी’, ‘विक्रम’ प्रमाणेच हा ‘लिओ’देखील त्याच युनिव्हर्समधला चित्रपट आहे. ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन, स्टंट्स, डायलॉगबाजी अन् ‘जवान’फेम अनिरुद्ध रवीचंदरचं पार्श्वसंगीत खिळवून ठेवणारं आहे.

चित्रपटात काही जंगली प्राण्यांचे सीन्ससुद्धा व्हीएफएक्सच्या माध्यमातून हुबेहूब सादर करण्यात आल्याचं ट्रेलरमध्ये स्पष्ट होत आहे. एलसीयू म्हणजेच लोकेस सिनेमॅटीक युनिव्हर्सप्रमाणे हा चित्रपटही दाक्षिणात्य राज्यात धुमाकूळ घालणार ही नक्की. शिवाय हिंदीतसुद्धा हा चित्रपट सगळे रेकॉर्ड मोडीत काढणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चित्रपट बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचीसुद्धा महत्त्वाची भूमिका आहे अन् त्या भूमिकेत संजय दत्त भाव खाऊन जात आहे. ‘लिओ’ १९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thalapathy vijay sanjay dutt starrer most awaited film of lcu leo trailer out now avn