कपिल शर्मा येत्या रविवारपासून छोट्या पडद्यावर कमबॅक करायला सज्ज झाला आहे. अर्थात हा शो सुरू होण्यापूर्वीच पुन्हा एकदा कपिल आणि त्याचा पूर्वीचा सहकलाकार सुनील ग्रोवर मधला वाद चवाट्यावर आला आहे. सुनीलचा शोमध्ये सहभाग का नाही? यावरून अनेक चाहत्यांनी प्रश्न विचारून दोघांनाही भांडावून सोडलं आहे. अशातच सुनीलनं हा शो नाकारण्याचं कारण वैयक्तिक वाद नसून दुसरंच काहीतरी असल्याचं म्हटलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कपिल शर्माचा ‘Family Time With Kapil Sharma’ हा शो २५ मार्चपासून सुरू होत आहे. यात सुनील ग्रोवरचा सहभाग का नाही यावरून अनेक प्रश्न विचारले जात आहेत. बॉलिवूड हंगामाच्या माहितीनुसार या शोमध्ये सहभागी होण्यास सुनीलनं एक अट वाहिनी आणि निर्मात्यांसमोर ठेवली होती. या कार्यक्रमाचं नाव ‘फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा’ऐवजी ‘फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा अँड सुनील ग्रोवर’ असं ठेवण्याची अट सुनीलनं ठेवली होती. अर्थात ही अट ठाम आणि नम्रपणे चॅनलने आणि निर्मात्यांनी नाकारली. शोमध्ये आपला वाटा कपिलइतकाच समसमान असावा असा प्रस्ताव सुनीलचा होता अर्थात तो नम्रपणे नाकारल्यामुळे सुनीलनं हा शो नाकारल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.

कॉमेडी शो हिट ठरण्यासाठी कपिलबरोबरच इतर कलाकारांचं योगदानही नक्कीच मोठं आहे पण त्यातली कपिलची मेहनत सर्वाधिक असल्यानं शोला पूर्णपणे त्याचचं नाव देण्यात यावं यासाठी सगळेच आग्रही होते. दरम्यान सुनीलनं मात्र आपल्याला कपिलच्या नव्या शोबद्दल विचारण्यात आलं नसल्याचं ट्विटरवर स्पष्ट करत या वादाला आणखी भडका दिला आहे. मला नव्या शोसाठी विचारण्यात आले नाही. मी वाट पाहिली आणि दुसरा शो साईन केला असं सुनीलनं ट्विटरवर म्हटलं आहे. तर कपिलनं मात्र सुनीलच्या आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. मी सुनीलला किमान शंभर फोन केले असतील दोनदा त्याच्या घरीही जाऊन आलो पण सुनीलनं मला कोणताही प्रतिसाद दिला नाही असं कपिलनं स्पष्ट करत सुनीलचे आरोप धुडकावून लावले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The real reason why sunil grover is not in kapil sharmas new show family time with kapil sharma