‘जोकर’ हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात सुपरस्टार व्हाकिन फिनिक्स याने जोकरची व्यक्तिरेखा साकारली होती. तिकीट बारीवर अक्षरश: धुमाकूळ घालणाऱ्या या खलनायकपटाचा दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ‘जोकर २’ साठी व्हाकिन फिनिक्सला तब्बल ३६७ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली असल्याची चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या अभिनेत्याने आजवर कधीही एकाच फ्रेंचाईजीच्या चित्रपटांच्या सीरिजमध्ये काम केलेलं नाही. किंबहूना केवळ एकच चित्रपट करुन हा अभिनेता फ्रेंचाईजी सोडून देतो. परंतु ‘जोकर’साठी मात्र त्याने आपला हा नियम मोडण्यास होकार दिला. या भूमिकेसाठी व्हाकिन फिनिक्सला ऑस्कर पुरस्कारानेदेखील सन्मानित केलं गेलं. अखेर प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आता तो जोकरच्या दुसऱ्या भागातही झळकणार आहे.

आणखी वाचा : “मी मरेपर्यंत त्याला…” पती आदिल खानशी लग्न आणि त्याच्या जामीनाबद्दल राखी सावंतचं मोठं वक्तव्य

मध्यंतरी व्हाकिन फिनिक्सचा या चित्रपटातील लूक रिवील करण्यात आला होता. आता नुकतंच या चित्रपटात व्हाकिनबरोबर काम करणाऱ्या अभिनेत्रीबद्दल माहिती समोर आली आहे. व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने चित्रपटाचा दिग्दर्शक टॉड फिलिप्सने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये व्हाकिन फिनिक्ससह अमेरिकन पॉप सिंगर लेडी गागाचा फर्स्ट लूक आपल्याला पाहायला मिळत आहे. लेडी गागा आणि व्हाकिन फिनिक्सचं चित्रपटातील एका दृश्यातील हा लूक पाहून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे. लेडी गागा या चित्रपटात हारले कुईन हे पात्र साकारणार आहे. तिनेसुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हाच फोटो पोस्ट केला आहे.

या फोटोवरुन जोकरच्या पुढील भागात या दोन पात्रांमधील नातं उलगडणार असल्याचं स्पष्ट होत आहे. २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘द डार्क नाईट’ या चित्रपटामुळे जोकर या पात्राला खरी प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटात अभिनेता हिथ लेजर याने जोकरची व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेसाठी हिथलाही ‘ऑस्कर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. चाहत्यांच्या आग्रहाखातर ‘जोकर’ या स्वातंत्र्य चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. या चित्रपटाला भारतातही चांगला प्रतिसाद मिळाला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Todd phillips shares a still of joaquin phoenix and lady gaga first look from joker 2 avn