आरआरआर’ चित्रपटाने इतिहास रचला आहे. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. ‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. या चित्रपटातील कलाकारांचेदेखील जगभरातून कौतुक होत आहे. ऑस्कर पुरस्कार पटकवल्यावर आता कलाकार मायदेशात परतल्यानंतर चाहत्यांनी त्यांचं जंगी स्वागत केले आहे. असं असताना यातील अभिनेता जुनियर एनटीआरने एक विधान केल्याने त्याचे चाहते अवाक झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुनियर एनटीआर तेलगू चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नुकताच तो हैदराबादमधील एक कार्यक्रमात उपस्थित होता. तेव्हा त्याला एका चाहत्याने आगामी प्रोजेक्टविषयी विचारले असता त्याने सांगितले की अद्याप कोणता ही चित्रपट स्वीकारला नाही. आगामी प्रोजेक्टविषयी चाहत्यांनी सातत्याने प्रश्न विचारल्यानंतर अभिनेत्याने वैतागून उत्तर दिले की ” मी कोणताही चित्रपट अद्याप स्वीकारला नाही मात्र सतत हा प्रश्न विचारला तर मी यापुढे चित्रपटात काम करणार नाही.” अशी प्रतिक्रया त्याने दिली.

जुनियर एनटीआर आता चित्रपटात काम करणार नाही हे ऐकताच चाहत्यांना धक्का बसला मात्र त्याने आपण गंमत करत आहोत असे सांगितले. जुनियर एनटीआर आता ‘एनटीआर ३०’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर यात झळकणार आहे. कोरटाला शिवा यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून येत्या ५ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tollywood actor jr ntr big said that he will not doing films anymore after fan asked spg