छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळात प्रवाशांना आता झटपट प्रवेश मिळणार आहे. प्रवेशद्वारांवर टू डी बारकोड रिडर्स ही यंत्रणा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) देण्यात आली असून, विमान तिकीट किंवा बोर्डिंग पासचे बारकोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशांना त्वरित प्रवेश मिळणार आहे. २६ जानेवारीपासून ही यंत्रणा कार्यरत होणार असून त्यामुळे प्रवासी आणि सीआयएसएफचाही वेळ वाचणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे. या विमानतळावरून दररोज ९०० पेक्षा अधिक विमान फेऱ्यांचे उड्डाण आणि आगमन होते. त्यामुळे दररोज दीड लाख प्रवाशांचा प्रवास या विमानतळावर होत असतो. गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांची गर्दी वाढतच आहे. वाढत्या गर्दीमुळे खबरदारी म्हणून काही उपाययोजना करण्याच्या सूचनाही नुकत्याच केंद्र सरकारने आढावा घेऊन केल्या होत्या. या आढाव्यात विमानतळावरील सुरक्षा तपासणीच्या क्षमतेनुसार उड्डाणांचे नियोजन करणे, प्रवाशांच्या सामानाची तपासणी यासह अन्य सेवांचे बारकाईने नियोजन करण्याच्या सूचनांचा समावेश होता. त्यानुसार विमानतळावरील टर्मिनल एक आणि दोनवर टू डी बारकोड रिडर्स ही यंत्रणा सीआयएसएफकडे देण्यात आली आहे. २६ जानेवारीपासून ही यंत्रणा कार्यरत होईल.

हेही वाचा – मुंबई : माघी गणेशोत्सवासाठी मंडपांचे शुल्क माफ, गेल्यावर्षीच्या परवानगीच्या आधारे परवानगी मिळणार

हेही वाचा – मुंबई : तोतया ईडी अधिकाऱ्याने व्यावसायिकाला घातला कोट्यवधीचा गंडा, ३ किलो सोने आणि २५ लाखांची रोख लूटली

विमानतळाच्या प्रवेशद्वारावर सीआयएसएफचे जवान तैनात असतात. ते प्रवाशांचे तिकीट किंवा बोर्डिंग पास तसेच ओळखपत्र तपासतात. त्यासाठी आधुनिक यंत्रणा नाही. या तपासणीसाठी प्रवाशांना रांग लावावी लागते आणि काहीसा वेळही जातो. तिकीट तपासणी झटपट व्हावी, यासाठी प्रवेशद्वारावर असलेल्या सीआयएसएफकडे बारकोड तपासणी रिडर्स यंत्रणा असेल आणि त्यांच्याकडून प्रवाशांच्या तिकीटावरील बारकोड स्कॅन केला जाईल. त्यामुळे त्वरित सर्व माहिती सीआयएसएफला मिळेल आणि प्रवाशांना विमानतळाच्या आत झटपट प्रवेश मिळेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2d barcode system for ticket check at mumbai airport gate mumbai print news