येथील जुहू समुद्रकिना-यावर काल रात्री सुमारे ३०-३५ फूट लांबीचा मृत व्हेल मासा आढळला.  हा व्हेल मासा ब्रुडीज जातीचा असून त्याचे वजन तब्बल २० टन असल्याची माहिती मिळाली आहे.
फोटो गॅलरीः जुहू किनाऱ्यावर आढळला ३० फुटांचा मृत मासा
समुद्राला भरती आल्याने काल रात्री हा मासा वाहून जुहूच्या किना-यावर पोहोचला आणि वाळूत रुतून बसला. वनखात्याकडून रात्रभर या ठिकाणची पाहणी करण्यात आली असून, या माशाला क्रेनच्या सहाय्याने हटवण्यात येणार आहे. त्याचा मृत्यू कसा झाला आणि तो किनाऱ्यावर कसा आला याचा तपास सुरु आहे. दरम्यान, त्याच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे कळते. त्यामुळे एखाद्या जहाजाची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dead whale washes ashore at mumbais juhu beach