NCB चे तपास अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला आहे. गोरेगाव या ठिकाणी हा हल्ला झाला. ड्रग्ज पेडलर्सकडून हा हल्ला मुंबईतील गोरेगावमध्ये काल संध्याकाळी झाल्याचं समजतं आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे असंही वृत्त एएनआयने दिलं आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं तेव्हा अनेक तारे-तारकांवर कारवाई करणारे समीर वानखेडेच होते. समीर वानखेडे हे एनसीबीचे विभागीय संचालक आहेत. बॉलिवूडचं असलेलं ड्रग्ज कनेक्शन त्यांनी उघड केलं होतं. आता त्यांच्यासह त्यांच्या टीमवर हल्ला झाला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एनसीबीच्या टीमवर ड्रग्ज पेडलर्सने हल्ला केला आहे. या हल्ल्यात समीर वानखेडेंसह एकजण जखमी झाला आहे. ही घटना काल रात्री घडली आहे. समीर वानखेडे हे कैरी मेंडिस नावाच्या व्यक्तीला पकडण्यास ते गेले होते. ड्रग्ज पेडलर कैरी मेंडिसला पकडताना हा हल्ला झाला. एकूण पाच लोकांची टीम या कारवाईसाठी गेली होती. कैरी मेंडिसला पकडून एनसीबी ऑफिसला आणण्यात आलं आहे. या हल्ला प्रकरणात एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे.

एनसीबीने परवाच कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज प्रकरणात अटक केली. त्यानंतर तिचा पती हर्ष लिम्बचिया याचीही कसून चौकशी केली. त्याआधी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची लिव्ह इन पार्टनर यांचीही चौकशी केली होती. ड्रग्ज प्रकरणात आधी रिया चक्रवर्तीला अटक झाली. त्यानंतर बॉलिवूडच्या अनेक लोकांची नावं समोर आली. दीपिका पदुकोण, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, दीपिकाची मॅनेजर, श्रुती मोदी, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर या सगळ्यांची चौकशी केली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncb zonal director sameer wankhede and his team were attacked allegedly by drug peddlers in goregaon scj