मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने नोव्हेंबरमध्ये प्रवासी वाहतुकीच्या बाबतीत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. विमानतळावरून प्रवास करणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. करोनानंतर प्रवाशांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एकूण २५,३७५ उड्डाणे झाली. तर, यंदा नोव्हेंबरमध्ये एकूण २८,६७९ उड्डाणे झाली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उड्डाणांमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली. तर,  नोव्हेंबर २०२३ मध्ये मुंबई विमानतळावरून ४४ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘एनआयए’कडून २० हून अधिक जणांची चौकशी; ‘आयसिस’शी संबंध असल्याचा आरोप

या महिन्यात दिल्ली, बेंगळूरु आणि चेन्नई ही मुंबई विमानतळावरून आघाडीची देशांतर्गत गंतव्यस्थळे हे स्थान कायम राखले. तर, दुबई, लंडन आणि अबुधाबी यांनी सर्वाधिक पसंतीची आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थळे हा मान कायम राखला. याशिवाय, एकटया मुंबई-दिल्ली मार्गावर ५,५७,३९३ प्रवाशांनी प्रवास केला आहे.  मुंबई विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्येही वाढ होत असल्याची नोंद झाली आहे. मुंबई विमानतळावरून नोव्हेंबरमध्ये एकूण २८,६७९ उड्डाणे झाली. यात २० हजारांहून अधिक देशांतर्गत आणि सात हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे होती.

२५ नोव्हेंबर रोजी सर्वाधिक प्रवाशांचा प्रवास या महिन्यात २५ तारखेला एका दिवसातील सर्वोच्च प्रवासी वाहतुकीची नोंद झाली. या एका दिवसात १,६७,१३२ प्रवाशांनी मुंबई विमानतळावरून प्रवास केला. यातील १,२०,००० हून अधिक देशांतर्गत प्रवासी आणि ४६,००० हून अधिक आंतरराष्ट्रीय प्रवासी होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over 44 lakh passengers travel from mumbai airport in november 23 zws