प्रथम श्रेणीऐवजी द्वितीय श्रेणीला पसंती; दुसऱ्या दिवशीही प्रवाशांची गर्दी

मुंबई: दोन लसमात्रा घेतलेल्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करून लोकल पास देण्यास बुधवारपासूून सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी मध्य व पश्चिम रेल्वेने ३४ हजार पासची विक्री के ली. बहुतांश प्रवाशांनी प्रथम श्रेणीऐवजी द्वितीय श्रेणीचा पास घेणे पसंत केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकल प्रवासासाठी ११ ऑगस्टपासून दोन लसमात्रा घेतलेल्यांचे प्रमाणपत्र पडताळणी करून मासिक पास देण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील १०९ स्थानकांवर सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत मदत कक्ष सुरू ठेवण्यात आली आहेत. महानगरातील त्या-त्या पालिकांचे कर्मचारी या मदत कक्षांवर तैनात असून प्रमाणपत्राची पडताळणी केल्यानंतर त्यावर आणि छायाचित्र ओळखपत्र पुराव्यावर शिक्का मारुन ते पुन्हा नागरिकांना देण्यात येतात. शिक्का मारलेले प्रमाणपत्र आणि छायाचित्र ओळखपत्र घेऊन रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीवर दाखवून प्रवाशांना १५ ऑगस्टपासूनचा पास मिळत दिला जात आहे. बुधवारी काही स्थानकात प्रचंड गर्दी, तर काही स्थानकात प्रवाशांचा मागमूस नव्हता. बोरिवली, डोंबिवलीत अधिक विक्री ल्ल पहिल्याच दिवशी ३४ हजार ३५३ जणांनी पास घेतले. यात मध्य रेल्वेवर २२ हजार ६८९ जणांनी आणि पश्चिम रेल्वेवर ११ हजार ६६४ जणांनी पास घेतले.

  • पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर सर्वाधिक पासची विक्री बोरिवली स्थानकात झाली. या स्थानकातून एक हजार १६९ जणांनी पास घेतले. त्यापाठोपाठ कांदिवली, चर्चगेट, अंधेरी, भाईंदर स्थानकातही मोठय़ा संख्येने पासची विक्री झाली.
  • पश्चिम रेल्वेवर द्वितीय श्रेणीचे नऊ हजार ४८१ आणि प्रथम श्रेणीचे दोन हजार १५३ आणि वातानुकू लित लोकलचे ३० पास विक्री झाल्याची माहिती दिली.
  • मध्य रेल्वेवरही बुधवारी २२ हजार ६८९ प्रवाशांनी पास घेतले. यात द्वितीय श्रेणीचे पास घेणाऱ्यांची संख्या अधिक होती. डोंबिवली स्थानकातून एक हजार ८८१ प्रवाशांनी पास खरेदी केले. कल्याण, मुलुंड, सीएसएमटी, ठाणे, बदलापूर, कु र्ला स्थानकातही पास घेणाऱ्यांची संख्या जास्त होती.

पाससाठीही झुंबड कायम

लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी आणि पास घेण्यासाठी अनेकांनी गुरुवारीही रेल्वे स्थानकांत धाव घेतली. अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू केल्याने सर्व प्रक्रि या वेळेत पार पडल्या. सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत पश्चिम रेल्वेवर चार हजार ७५५ पासची खरेदी के ली. यामध्येही द्वितीय श्रेणीचे चार हजार १०५ आणि प्रथम श्रेणीच्या ६३८ पासचा समावेश आहे. मध्य रेल्वेवर दुपारी तीनपर्यंत १३ हजार ३०० पास प्रवाशांना देण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sale of 34000 passes on the first day mumbai railway ssh