मंत्रिपदाचा दर्जा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : राज्यातील विविध प्रस्तावांचा केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील खासदारांची बैठक झाली होती. त्यामध्ये केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत चर्चा करण्यात आली होती. या प्रस्तावांचा वेळोवेळी पाठपुरावा करण्यासाठी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याबाबतचा शासन आदेश शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला.

समितीचे अध्यक्ष सावंत यांचे कार्यालय नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात असेल. त्यांना आवश्यक सुविधा तसेच अधिकारी-कर्मचारी नवी दिल्लीतील सचिव, निवासी आयुक्त हे महाराष्ट्र सदन यांच्याकडून देण्यात येणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mp arvind sawant named chairman of maharashtra parliamentary panel zws