मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी, गुरुवारी गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल केले आहेत. अनेक भागांतील रस्ते बंद करण्यात येणार असून वाहनतळही बंद ठेवण्यात येणार आहेत. महापालिकेनेही विसर्जनासाठी कृत्रिम हौद बांधण्यासह तयारी पूर्ण केली आहे. मुंबईत साधारण १३ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून, ७० हजारांहून अधिक घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीचे प्रमाण अधिक असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जल्लोषात निघणाऱ्या मिरवणुका पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन शहरातील वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. गिरगाव, दादर, जुहू, मालाड, मालवणी टी जंक्शन आणि गणेशघाट पवई यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. महापालिकेनेही नैसर्गिक तसेच कृत्रिम विसर्जनस्थळांवर गर्दी हाताळण्याच्या दृष्टीने सिद्धता केली आहे. मध्य रेल्वेने अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रवाशांसाठी १० विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सीएसएमटी – कल्याण, ठाणे, बेलापूरदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic changes in mumbai preparations of the municipal corporation for immersion processions are complete ysh