Uddhav Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली असून आता सगळ्याच पक्षांना वेध लागले आहेत ते महापालिका निवडणुकांचे. साधारण १६ हून अधिक महापालिकांच्या निवडणुका बाकी आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंनी सुधीर साळवींना सचिव पद देण्यात आलं आहे. त्याबाबत आज त्यांनी भाष्य केलं आहे.

सुधीर साळवींना देण्यात आलं सचिवपद

सुधीर साळवी यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने सचिवपदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर त्यांना लालबागचा राजा पावला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे प्रवक्ते आणि काही पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर आता सुधीर साळवी यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.. आगामी मुंबई महानगरपालिकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो आहे.

उद्धव ठाकरे सुधीर साळवींबाबत काय म्हणाले?

“सुधीरवर मोठी जबाबदारी दिली आहे, तुम्ही लालबागकर आहात. सुधीर आता लालबागमध्ये राहिला, त्याला शिवसेनेचे सचिवपद दिलं आहे. लालबाग परळ म्हणजे कट्टर शिवसैनिक आलाच. काल परवा बातम्या आल्या उद्धव ठाकरे यांची मोठी खेळी. आपली खेळी मोठीच असते लक्षात ठेवा. पण, आपलं लक्ष आता मुंबई महानगरपालिका आहे, त्यासाठी सुधारला सचिव पद दिलेलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मी सुधीरला मुंबईत पळवणार आहे, सर्वच एकत्र आहात, एकजुटीने रहा. मुंबई आणि महाराष्ट्रावरील संकट बाजूला टाकण्यासाठी आपण एकत्र आहोत, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२० वर्षांपासून लालबाग राजा मंडळाचे मानद सचिव म्हणून साळवी कार्यरत

माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सचिवपदी सुधीर साळवी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. सुधीर साळवी हे लालबागचा राजा सार्वजनिक मंडळात गेल्या ३५ वर्षांपासून कार्यकारिणीत आहेत. २० वर्षांपासून सातत्याने मंडळाचे मानद सचिव म्हणून ते यशस्वी नेतृत्व करत आहेत. तसंच त्यांचं शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातलं योगदान मोठं आहे असं पत्रकात म्हटलं गेलं आहे. विधानसभा निवडणुकांवेळी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली होती. मात्र, विद्यमान आमदार अजय चौधरी यांनाच तिकीट देण्यात आले. त्यावेळी सुधीर साळवी यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते. मात्र, आता कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाल्याचं दिसून येत आहे. कारण, सुधीर साळवी यांना सचिवपदाची जबाबदारी देण्यासोबतच आगामी मुंबई महापालिका निवडणुकांचेही मिशनही उद्धव ठाकरेंनी दिले आहे.