भारतीय नौदलात प्रशिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय अग्नीवीर तरुणीने मुंबईतील आयएनएस हमला येथील महिला वसतिगृहात आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, अपर्णा व्ही नायर, अग्निवीर लॉजिस्टिक्स (F And A), वय २०, आयएनएस हमला, मुंबई येथे २७ नोव्हेंबर रोजी अनैसर्गिक मृत्यू झाला आहे. तिच्या कुटुंबियांच्या दुःखात भारतीय नौदल सहभागी आहे.

अपर्णाने तिच्या वसतिगृहाच्या खोलीत बेडशीटचा वापर करून गळफास घेतला आहे. तिची रुममेट खोलीत आल्यानंतर तिने हा अपर्णाचा मृतदेह पाहिला. तिने याविषयी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. अपर्णाचा मृतदेह बोरिवली शवविच्छेदन केंद्रात पाठवण्यात आला असून मंगळवारी तिचे नातेवाईक केरळहून मुंबईत आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, अपर्णा ही केरळमधील पथनमथिट्टा येथील शेतकऱ्याची मुलगी आहे. ती सुरुवातीला चार महिने ओडिशा येथे प्रशिक्षण घेत होती. गेल्या महिन्याभरापासून ती मुंबईत राहत होती.

पोलीस तिच्या फोनचे रॉकॉर्ड तपासत असून वैयक्तिक कारणामुळे तिने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman undergoing agniveer training dies by suicide at navy hostel in mumbai sgk